नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – ठेकेदाराने (Contractor) केलेल्या कामाच्या 8 कोटी 45 लाखांच्या देयकापोटी 43 लाख 75 हजार रुपयाची लाच मागणाऱ्या (Demand Bribe) नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील जिल्हा परिषदेच्या (Nandurbar Zilla Parishad) उप उपविभागीय अभियंता (Sub-Divisional Engineer), सहायक अभियंता (Assistant Engineer) आणि खासगी पंटरला नंदुराबर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Nandurbar) सापळा रचून अटक केली. उप उपविभागीय अभियंता सुनील दिगंबर पिंगळे Sunil Digambar Pingale (वय-48), सहाय्यक अभियंता संजय बाबुराव हिरे Sanjay Baburao Hiray (वय 52), खाजगी पंटर अभिषेक सुभाष शर्मा Abhishek Subhash Sharma (वय-32) यांना 4 लाखाचा पहिला हप्ता घेताना (Accepting Bribe) नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Nandurbar) आज (बुधवार) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे नंदुराबर बांधकाम विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
तक्रारदार (वय-59) हे शासकीय मान्यताप्राप्त व नोंदणीकृत बांधकाम ठेकेदार (Registered Construction Contractor) आहेत. तक्रारदार यांना जिल्हा परिषद अंतर्गत अक्कलकुवा (Akkalkuwa) उपविभागामार्फत भगदरी येथील गुरांच्या दवाखान्याची (Veterinary Clinic) नवीन इमारत बांधणे, रस्ता सुधरणा, रस्ता जलनिस्सारणाची कामे व इतर 45 कामांचे कार्यारंभ आदेश मिळाले होते. तक्रारदार यांनी ही सर्व कामे पूर्ण केली आहेत. या कामांबाबत अक्कलकुवा येथील जिल्हा परीषद उपविभागीय अभियंता सुनील पिंगळे, सहाय्यक अभियंता संजय हिरे यांनी तक्रारदारांचे 8 कोटी 45 लाख 89 हजार रुपयांची देय बीले मंजूर (Payable Bills Approved) केली.
मंजूर केलेल्या बिलांपैकी 7 कोटी 61 लाख 89 हजार रुपये तक्रारदार यांना मिळाली आहे. उर्वरित 84 लाख रुपये रक्कम संबंधित अधिकाऱ्यांनी राखून ठेऊन तक्रारदार यांना मुद्दामहुन अनामत रक्कम (Deposit Amount) राखून ठेवल्याचे सांगितले. ही रक्कम मिळावी यासाठी तक्रारदार यांनी वेळोवेळी जिल्हा परीषद कार्यालयात पिंगळे आणि हिरे यांची भेट घेतली.
पिंगळे आणि हिरे यांनी यापूर्वी आदा केलेल्या रकमेच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे लाच मागितली. यामध्ये पिंगळे याने 30 लाख 50 हजार रुपये व शाखा अभियंता हिरे याने 13 लाख 25 रुपये अशी एकूण 43 लाख 75 हजार रुपयांची लाच मागितली. तसेच ही रक्कम दिली नाही तर उर्वरीत रक्कम तुम्हाला मिळू देणार नसल्याची धमकी (Threat) दिली.
रक्कम देण्याची हमी म्हणून अधिकाऱ्यांनी तक्रारदार यांच्याकडून जळगाव जनता सहकारी बँक शाखा नंदुरबार (Jalgaon Janata Sahakari Bank Branch Nandurbar) या बँकेचे 30 लाख 50 हजार व 13 लाख 25 हजार रुपयांचे दोन धनादेश दिनेश यादवराव सोनवणे (Dinesh Yadavrao Sonawane) या ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने लाचेपोटी लिहून घेऊन त्याच्या ताब्यात ठेवले. तसेच रोख रक्कम आणून दिल्यानंतर धनादेश परत देऊ असे तक्रारदार यांना सांगण्यात आले.
तक्रारदार यांनी याबाबत नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Nandurbar) तक्रार केली. पथकाने पडताळणी केली असता आरोपींनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच लाचेच्या ठरलेल्या रक्कमेपैकी टोकन रक्कम 4 लाख लाख रुपये आज स्विकारण्याचे मान्य केले. नंदुरबार एसीबीच्या (ACB Nandurbar) पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून 4 लाखांची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने (SP Sunil Kadasane),
अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे (Addl SP Narayan Nyahalde),
पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे (Deputy Superintendent of Police Satish Bhamare)
यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबी नंदुरबारचे पोलीस उप अधीक्षक राकेश आ. चौधरी (Deputy Superintendent of Police Rakesh Chaudhary),
पोलीस निरीक्षक समाधान महादू वाघ (Police Inspector Samadhan Mahadu Wagh),
पोलीस निरीक्षक माधवी एस. वाघ (Police Inspector Madhavi S. Wagh), पोलीस हवालदार उत्तम महाजन,
विलास पाटील, विजय ठाकरे, पोलीस नाईक अमोल मराठे, संदीप नावाडेकर, देवराम गावित,
महिला पोलीस नाईक ज्योती पाटील व चालक पोलीस नाईक जितेंद्र महाले यांच्या पथकाने केली.
Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Nandurbar | Demand for bribe of Rs 43.75 lakh! While accepting Rs 4 lakh ACB arrest Sub-Divisional Engineer-Assistant Engineer of ZP Nandurbar
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update