Anti Corruption Bureau (ACB) Nashik | प्रजासत्ताक दिनी चांगली परेड केली म्हणून ‘सत्कार’, दुसऱ्या दिवशी 2 पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

श्रीरामपूर : पोलीसनामा ऑनलाइन – तक्रारदारास सहकार्य करण्यासाठी 15 हजारांच्या लाचेची मागणी करुन दहा हजारांची लाच घेताना (Accepting Bribe) दोन पोलीस कर्मचाऱ्यांना (Police Personnel) नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Nashik) रंगेहाथ पकडले. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Nashik) ही कारवाई श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये (Shrirampur city police station) केली आहे. सुनिल उत्तमराव वाकचौरे (Sunil Uttamrao Wakchaure) आणि गणेश हरी ठोकळ (Ganesh Hari Thokal) अशी या पोलिसांची नावे आहेत.

 

तक्रारदार व त्याच्या भावात घराची भिंत बांधण्यावरुन आपसांत वाद असलेल्या ठिकाणी तक्रारदारास काम करण्यास, तसेच सहकार्य करण्यासाठी वाकचौके आणि ठोकळ यांनी 15 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीमध्ये 10 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना लाच घेताना पकडले.

 

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात लाचखोरी वाढली असून आतापर्यंत चार कर्मचारी एसीबीच्या (ACB) जाळ्यात अडकले आहे.
विशेष म्हणजे 26 जानेवारी रोजी हवालदार वाकचौरे यांनी चांगली परेड केली म्हणून अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर (Additional Superintendent of Police Swati Bhor) यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
मात्र, 27 जानेवारीला ते अँन्टी करप्शनच्या जाळ्यात अडकले.

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Nashik | two corrupt policemen arrested in shrirampur by acb

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा