Anti Corruption Bureau (ACB) Pune | डी. पी. ओपिनियन देण्यासाठी 3.5 लाखांची मागितली लाच, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व्हेअर एसीबीच्या जाळ्यात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption Bureau (ACB) Pune | विकास योजनेचा अभिप्राय Feedback on Development Plan (डी. पी. ओपिनियन – D .P. Opinion) देण्यासाठी 3 लाखाची लाच मागणाऱ्या (Demanding Bribe) पिंपरी – चिंचवड महापालिकेतील (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) नगररचना व विकास विभागातील सर्व्हेअर (Surveyor) याच्यावर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. संदीप फकीरा लबडे Sandeep Fakira Labade (वय – 48) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सर्व्हेअरचे नाव आहे. पुणे एसीबीने बुधवारी (दि. 3) दुपारी दोनच्या सुमारास पालिकेच्या तळमजल्यावर असलेल्या नगररचना विभागाच्या कार्यालयातून संदीप लबडे याला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

 

नगररचना विभागातील सर्व्हेअर संदीप लबडे याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 38 वर्षाच्या तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Pune) तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी 28 मार्च, 29 मार्च, 30 मार्च, 1 जुलै आणि 19 जुलै रोजी पडताळणी केली होती.

तक्रारदार काम करत असलेल्या कंपनीचे विकास योजनेचा अभिप्राय (डी. पी. ओपिनियन) देणेसाठी प्रथम 3 लाख 50 हजार रुपयांची मागणी केली होती.
तडजोडीअंती 3 लाख रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे (Pune ACB) तक्रार केली.
प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता संदीप लबडे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
बुधवारी (दि. 3) दुपारी दोनच्या सुमारास लबडे याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक क्रांती पवार (Deputy Superintendent of Police Kranti Pawar),
पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे (Police Inspector Shriram Shinde), पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर (Police Inspector Praveen Nimbalkar),
पोलीस हवालदार अयाचित, महिला पोलीस हवालदार वेताळ, पोलीस नाईक वैभव गोसावी, पोलीस शिपाई दिनेश माने,
सौरभ महाशब्दे, चालक श्रीखंडे, वाळके, कदम, पांडुरंग माळी यांच्या पथकाने केली.

 

Web Title : –  Anti Corruption Bureau (ACB) Pune | 3.5 lakh bribe demanded for giving DP opinion, surveyor of Pimpri-Chinchwad Municipal Corporation in custody of ACB

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा