Anti Corruption Bureau (ACB) Pune | 15 हजाराची लाच मागणारा बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सरकारी कामे करण्यासाठी आवश्यक असणारा परवाना देण्यासाठी 15 हजार रुपये लाच मागणाऱ्या (Demand Bribe) बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिकाविरुद्ध (Senior Clerk) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी करण्यात आली आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) केलेल्या या कारवाईमुळे बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे.

 

अनिल कोंडाजी आढारी Anil Kondaji Adhari (वय-40) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 42 वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Pune) तक्रार केली. तक्रारदार यांनी तक्रार केल्यांतर पुणे एसीबीकडून (Pune ACB) 29 सप्टेंबर 2021 रोजी पडताळणी करण्यात आली. यानंतर सोमवारी (दि.31 जानेवारी) आढारी विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल आढारी हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंगळवार पेठेतील उप विभागात वरिष्ठ लिपिक म्हणून काम करत आहे.
तक्रारदार यांना कंपनीसाठी सरकारी कामे (Government Work) करण्यासाठी परवाना आवश्यक असल्याने त्यांनी बांधकाम विभागाकडे अर्ज केला होता.
परवाना (License) देण्यासाठी आढारी याने 10 ते 15 हजार रुपये लाचेची मागणी केली.
ही लाच त्याने स्वत:साठी आणि वरिष्ठांसाठी मागितली.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी अर्जावरुन पडताळणी केली असता अनिल आढारी याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार आढारी विरिद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) अपर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgauda) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक अलका सरग (Police Inspector Alka Sarg) करीत आहेत.

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Pune | A senior clerk in the construction department who demanded a bribe of Rs 15,000 was caught by anti corruption

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा