Anti Corruption Bureau (ACB) Pune | 2 लाखाची लाच मागणारे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यकारी अभियंता प्रमोद तुपे आणि उप अभियंता अरविंद फडतरे ‘गोत्यात’, एसीबीकडून गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap In Krushi Utpanna Bazar Samiti Pune | पुण्यातील मार्केट यार्ड (Market Yard) मधील इमारतीच्या स्वच्छतागृहाचे नुतनीकरण (Toilets Renovation) व उद्योग भवन (Udyog Bhavan) येथील स्लॅबच्या कामाचे बिल मंजूर (Bill Approved) करण्यासाठी 2 लाखाची लाच मागणी करणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथील (Krushi Utpanna Bazar Samiti Pune) कार्यकारी अभियंता (Executive Engineer) आणि उप अभियंता (Deputy Engineer) यांच्यावर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि.6) करण्यात आली. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) केलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

 

कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यकारी अभियंता प्रमोद कृष्णराव तुपे (Pramod Krishnarao Tupe), उप अभियंता अरविंद दामोदर फडतरे (Arvind Damodar Phadtare) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत. याबाबत 26 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Pune) तक्रार केली होती.

 

तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक (Builders) आहेत.
त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथील इमारतीच्या स्वच्छतागृहाचे नुतनीकरण व
उद्योग भवन क्र.1 येथील स्लॅबचे वॉटर प्रुफिंगचे (Waterproofing) काम केले होते.
या दोन कामांचे बिल मंजूर करण्यासाठी बिलाच्या 15 टक्के रक्कम लाच (Bribe) म्हणून मागितली.
याबाबत तक्रारदार यांनी पुणे एसबीकडे (Pune ACB) तक्रार केली.

तक्रारदाराची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुणे एसीबीने 10 ऑगस्ट 2021, 11 ऑगस्ट 2021, 21 ऑगस्ट 2021 आणि 23 ऑगस्ट 2021 रोजी पडताळणी केली.
त्यावेळी तक्रारदार यांनी केलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी प्रमोद तुपे आणि अरविंद फडतरे यांनी 15 टक्के रक्कम लाच म्हणून मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार आज (बुधवार) त्यांच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav)
यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे युनिटच्या पोलीस उप अधीक्षक विजयमाला पवार (DySP Vijaymala Pawar) यांनी केली.
पुढील तपास पोलीस उप अधीक्षक सीमा अडनाईक (DySP Seema Adnaik) करीत आहेत.

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Pune | ACB files case against Pramod Tupe and Arvind Phadtare, ACB Trap In Krushi Utpanna Bazar Samiti Pune Market Yard

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PM Modi-Sharad Pawar Meeting | पंतप्रधान मोदींसोबत कोणत्या गोष्टींवर चर्चा झाली?; स्वत: शरद पवारांनी सांगितलं…

 

Pune Crime | मंडप व्यावसायिकाला ऑनलाइन 12 लाखांचा गंडा, पुणे सायबर पोलिसांनी मुंबईतून दोघांना केली अटक

 

Ajit Pawar On PM Modi-Sharad Pawar Meeting | शरद पवार आणि पंतप्रधान मोदींमध्ये कशावर चर्चा झाली?; अजित पवारांनी अंदाज व्यक्त करत सांगितलं कारण