Anti Corruption Bureau (ACB) Pune | 20 हजाराची लाच घेताना महिला तलाठ्यासह खासगी व्यक्ती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – म्हाळुंगे येथे खरेदी केलेल्या जमिनीच्या (Land) सातबारा (7/12) उताऱ्यावर नोंदी करण्यासाठी 30 हजार रुपयाची लाच मागून (Demand Bribe) 20 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) महिला तलाठी वर्षा मधुकर धामणे Talathi Varsha Madhukar Dhamne (वय – 45) आणि खासगी इसम अकबर यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) सापळा रचून अटक (Arrest) केली. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) ही कारवाई खेड तालुक्यातील (Khed Taluka) आंबेठाण तलाठी कार्यालयात (Ambethan Talathi Office) आज (बुधवार) केली.

 

याबाबत 32 वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Pune) तक्रार केली आहे. तर लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या महिला तलाठी वर्षा धामणे यांच्याकडे म्हाळुंगेसह (Mahalunge) आंबेठाणचा अतिरिक्त कार्यभार आहे. तक्रारदार यांनी 2017 मध्ये म्हाळुंगे येथे जमिन खरेदी केली आहे. खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर तक्रारदार यांना नोंदणी करायची होती. सातबाऱ्यावर नोंदणी (Registration) करण्यासाठी खासगी इसम अकबर याने सुरुवातीला एक लाख रुपये लाच मागितली. यानंतर तलाठी वर्षा धामणे यांनी 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीत 20 हजार रुपये देण्याचे ठरले होते.

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे (Pune ACB) तक्रार केली. पथकाने 5,8,10 आणि 11 मार्च रोजी पडताळणी केली. पडताळणीमध्ये तलाठी वर्षा धामणे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज आंबेठाण तलाठी कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून 20 हजार रुपये लाच घेताना तलाठी वर्षा धामणे आणि खासगी इसम अकबर यांना रंगेहाथ पकडले. आरोपींवर चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक ज्योती पाटील (Police Inspector Jyoti Patil) करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Pune | ACB Pune Arrest Lady Talathi while taking bribe of 20 thousands

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा