Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुण्यात 5 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (PSI), पोलीस हवालदार यांच्यावर अँटी करप्शनकडून FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दाखल गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी 5 हजार रुपये लाच मागणाऱ्या (Demand Bribe) शिरुर पोलीस ठाण्यातील (Shirur Police Station) पोलीस उपनिरीक्षक Police Sub Inspector (PSI) आणि पोलीस हवालदार (Police Constable) यांच्यावर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरेश कुंडलिक गीते (PSI Suresh Kundlik Geete) आणि पोलीस हवालदार संतोष रामदास साठे (Police Constable Santosh Ramdas Sathe) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन पोलिसांची नावे आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) केलेल्या या कारवाईमुळे पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) दलात खळबळ उडाली आहे.

 

याबाबत 36 वर्षाच्या तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Pune) तक्रार केली. त्यानुसार पुणे एसीबीने 5 फेब्रुवारी आणि 6 फेब्रुवारी रोजी पडताळणी केली होती. त्यामध्ये सुरेश गीते आणि संतोष साठे यांनी तक्रारदार यांच्याकडे 10 हजार लाच मागून तडजोडीत 5 हजार रुपये लाच घेण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार शुक्रवारी (दि.29) सुरेश गीते आणि संतोष साठे यांच्याविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम (Prevention of Corruption Act) 7,12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांच्या सहकाऱ्याविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्यात जामीन (Bail) मिळवून देण्यासाठी सुरेश गीते आणि संतोष साठे यांनी 10 हजार रुपये लाच मागितली.
तडजोडीमध्ये 5 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.
त्यानुसार एसीबीने (Pune ACB) पडताळणी केली असता गीते आणि साठे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav)
यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे युनिटच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक विरनाथ माने (Police Inspector Virnath Mane) करीत आहेत.

 

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Pune | Anti Corruption FIR against Sub Inspector of Police PSI Suresh Kundlik Geete, Police Constable Santosh Ramdas Sathe for soliciting bribe of Rs 5000 in Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा