Anti Corruption Bureau (ACB) Pune | 2 लाखाची लाच मागणारा सहायक पोलीस निरीक्षक अँटी कप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दोन लाख रुपये लाचेची मागणी (Demand Bribe) करणाऱ्या पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) दलातील सहायक पोलीस निरीक्षकाविरुद्ध (Assistant Inspector of Police (API) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक देविदास हिरामण कारंडे (API Devidas Hiraman Karande) असे लाच मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) गुन्हा दाखल केल्याने पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

 

सहायक पोलीस निरीक्षक कारंडे हे पुणे ग्रामीण पोलीस दलातील रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Ranjangaon MIDC Police Station) कार्यरत आहेत. याबाबत 30 वर्षाच्या तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Pune) तक्रार केली. पथकाने 8 जून रोजी पडताळणी करुन गुरुवारी (दि.16) गुन्हा दाखल केला आहे.

 

तक्रारदार यांचे रांजणगाव येथील एका कंपनीकडे लेबर क्रॉन्ट्रक्ट (Labor Contract) असून या क्रॉन्ट्रक्ट प्रमाणे कंपनीकडे थकीत रक्कम आहे. थकीत रक्कम मिळवून देण्यासाठी व कंपनीशी पुढील करार चालू ठेवण्याच्या अनुषंगाने तक्रारदाराविरुद्ध कारवाई न करण्यासाठी देविदास कारंडे यांनी दोन लाख रुपये लाच मागितली. मात्र, तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे (Pune ACB) तक्रार केली.

पुणे एसीबीने तक्रारीची पंचासमक्ष 8 जून रोजी पडताळणी केली असता एपीआय देविदास कारंडे यांनी दोन लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पुणे एसीबीने (Pune ACB)  कारंडे यांच्यावर रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार (Prevention of Corruption Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक विरनाथ माने (Police Inspector Virnath Mane) करीत आहेत.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी,
असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Pune | Assistant Inspector of Police caught demanding Rs 2 lakh bribe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune PMC Medical Education Trust | भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात कायमस्वरूपी शिक्षक व कर्मचारी भरती होणार

 

Ajit Pawar | ‘देहूमधील कार्यक्रमाबद्दल मला काहीच बोलायचे नाही’; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

 

Nitin Gadkari | नितीन गडकरींची मोठी घोषणा ! चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या गाडीचा फोटो काढा आणि 500 रुपये मिळवा