Anti Corruption Bureau (ACB) Pune | महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा शाखा अभियंत्यासह उप अभियंता 2500 रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – इलेक्ट्रिक (Electric) व वॉटर प्युरीफायरच्या (Water Purifiers) कामाच्या अंदाजपत्रकास (Budget) तांत्रिक मंजुरी देण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच घेताना (Accepting Bribe) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे (Maharashtra Jeevan Pradhikaran Pune) शाखा अभियंता (Branch Engineer) आणि यांत्रिकी उप अभियंत्याला (Deputy Mechanical Engineer) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) रंगेहात पकडले. यांत्रिकी उप अभियंता किरण अरुण शेटे Kiran Arun Shete (वय-31), शाखा अभियंता परमेश्वर बाबा हेळकर Parmeshwar Baba Helkar (वय-49) असे लाच घेताना रंगेहात पकडलेल्यांची नावे आहेत. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) ही कारवाई बुधवारी (दि.6) केली.

 

याप्रकरणी 34 वर्ष व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Pune) तक्रार केली होती. तक्रारदार हे लेबर कॉन्ट्रॅक्टर (Labor Contractor) आहे. खेड तालुक्यातील (Khed Taluka) शिवेगाव येथील अंगणवाडीच्या इलेक्ट्रिक व वॉटर प्युरीफायरच्या कामाच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मंजुरी देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय लष्कर पुणे येथील किरण शेटे आणि परमेश्वर हेळकर यांनी अंदाजपत्रकाच्या 2 टक्के रक्कमेची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.

 

पुणे एसीबीच्या (Pune ACB) पथकाने 30 जून रोजी पडताळणी केली असता किरण शेटे व परमेश्वर हेळकर यांनी अंदाजपत्रकाच्या 2 टक्के रकमेची लाच मागणी करुन 2500 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पथकाने बुधवारी सापळा रचून हेळकर याला तक्रारदार यांच्याकडून 2500 रुपये लाच स्विकारताना रंगेहात पकडले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर (Police Inspector Praneta Sangolkar),
पोलीस निरीक्षक भारत साळुंखे (Police Inspector Bharat Salunkhe), पोलीस कॉन्स्टेबल भूषण ठाकूर,
दिनेश माने, महिला पोलीस कॉन्स्टेबल पूजा पागिरे, चालक चंद्रकांत कदम यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Pune | Branch Engineer of Maharashtra Jeevan Pradhikaran along with Deputy Engineer caught taking bribe of Rs 2500

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Cabinet Expansion | शिंदे आणि फडणवीसांच्या सरकारमध्ये कुणाचा वरचष्मा? कोणत्या अपक्ष आमदारांना लागणार मंत्रीपदाची लॉटरी; जाणून घ्या

 

 

Gulabrao Patil | शिवसेना वाचवण्यासाठीच आम्ही मंत्रीपदे सोडली – गुलाबराव पाटील

 

Pune Crime | पेट्रोल व डिझेल चोरी करणारी टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड, 81 लाखाचा मुद्देमाल जप्त