Anti Corruption Bureau (ACB) Pune | 50 हजाराची लाच मागणाऱ्या पोलिसावर पुणे एसीबीकडून FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption Bureau (ACB) Pune | पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी जप्त केलेले मोबाईल परत देण्यासाठी 50 हजार रुपये लाच (Bribe) मागणाऱ्या पोलीस नाईक बाळासाहेब पंढरीनाथ पानसरे Police Naik Balasaheb Pandharinath Pansare (वय-40) यांच्यावर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पानसरे यांच्यावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात (Wadgaon Nimbalkar Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Pune) 19 मे रोजी तक्रार केली आहे. प्राप्त तक्रारीची पडताळणी करुन पुणे एसीबीने (Pune ACB) आज (सोमवार) गुन्हा दाखल केला आहे. पानसरे हे वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या गावातील एक व्यक्ती मिसिंग (Missing) असल्याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पानसरे यांनी तक्रारदार यांचे दोन मोबाईल ताब्यात घेतले होते. ते मोबाईल परत करण्यासाठी पानसरे यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली. तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी केली असता पानसरे यांनी 50 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज (सोमवार) वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे युनिटच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक भारत साळुंखे (Police Inspector Bharat Salunkhe) करीत आहेत.

Web Title : Anti Corruption Bureau (ACB) Pune | Bribe Case Register On Pune Rural Wadgaon Nimbalkar Police Station police man

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त