×
Homeअ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)Anti Corruption Bureau (ACB) Pune | 9000 रुपयांची लाच स्विकारताना उप कोषागार...

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 9000 रुपयांची लाच स्विकारताना उप कोषागार अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

शिरुर/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आईचे वैद्यकीय बील (Medical Bill) मंजूर (Approved) करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागून 9 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) उप कोषागार कार्यालयातील उप कोषागाराला (Sub Treasury) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) सापळा रचून अटक (Arrest) केली. रमेश काशिनाथ घोडे Ramesh Kashinath Ghode (वय – 47) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या उप कोषागार अधिकाऱ्याचे नाव आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) ही कारवाई गुरुवारी (दि.24) केली आहे.

 

याबाबत 32 वर्षाच्या व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Pune) तक्रार केली आहे. तक्रारदार यांचे वडील (Father) शासकीय नोकर (Government Servant) असून तक्रारदार यांच्या आईचे वैद्यकीय उपचाराचे बिल उप कोषागार कार्यालय शिरूर (Sub Treasury Office Shirur) येथे मंजूरी करीता दिले होते. तक्रारदार यांच्या आईचे वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी घोडे याने तक्रारदार यांच्याकडे बिलाच्या 10 टक्के 29 हजार रुपये लाच मागितली.

पुणे एसीबीने (Pune ACB) पडताळणी केली असता तक्रारदार यांच्या आईचे वैद्यकीय बिल मंजूर करुन देण्यासाठी आरोपीने 10 हजार लाचेची मागणी करुन 9 हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केले. पथकाने आज सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम घेताना रमेश घोडे याला रंगेहाथ पकडले. आरोपी रमेश घोडे याच्यावर शिरुर पोलीस ठाण्यात (Shirur Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav),
सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgauda)
यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक शितल घोगरे (Deputy Superintendent of Police Shital Ghogare) करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Pune | Deputy Treasury Officer caught in anti corruption scam while accepting bribe of Rs 9000

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा 

 

 

 

Must Read
Related News