Anti Corruption Bureau (ACB) Pune | 20 हजार रुपयाची लाच घेताना महावितरण कंपनीचा उप कार्यकारी अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – इलेक्ट्रिक ठेकेदाराकडून ग्राहकांचे ओपन प्लॉटमध्ये ट्रांसफार्मर कनेक्शन घेण्यासाठी चे अंदाजपत्रक (Budget) तयार करुन ते पुढील कार्यालयास पाठवण्यासाठी महावितरण (MSEDCL) कंपनीच्या उरुळी कांचन (Uruli Kanchan) उपविभागातील उप कार्यकारी अभियंत्याला (Deputy Executive Engineer) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. पुणे लाचलुचपत प्रतिंबधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) ही कारवाई गुरुवारी (दि.10) केली. प्रदीप वासुदेव सुरवसे Pradeep Vasudev Suravase (वय-48) असे लाच घेताना (Accepting Bribe) रंगेहाथ पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

याप्रकरणी 39 वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Pune) तक्रार केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे इलेक्ट्रिक ठेकेदार (Electric contractor) असून त्यांच्याकडील ग्राहकांचे ओपन प्लॉटमध्ये ट्रान्सफार्मर कनेक्शन घेण्यासाठी अंदाजपत्रक तयार करुन ते पुढील कार्यालयास पाठवायचे होते. यासाठी प्रदीप सुरवसे याने तक्रारदार यांच्याकडे 25 हाजार रुपयांची लाच मागितली.

 

तडजोडीमध्ये 20 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे (Pune ACB) तक्रार केल्यानंतर पथकाने पडताळी केली.
त्यावेळी प्रदीप सुरवसे याने तक्रारदार यांच्याकाडे 20 हजार लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
पथकाने सापळा रचून प्रदीप सुरवसे याला तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना रंगेहाथ पकडले.
आरोपी प्रदीप सुरवसे याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav), सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgauda)
यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
पुढील तपास पोलीस उप अधीक्षक सीमा आडनाईक (DySP Seema Adnaik) करीत आहेत.

 

Web Title :- MSEDCL Deputy Executive Engineer Pradeep Vasudev Suravase caught taking bribe of Rs 20,000 Anti Corruption Bureau (ACB) Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kasturi Educational Institution | ‘कस्तुरी स्कुल ऑफ लॉ’तर्फे 14 ते 19 फेब्रुवारी दरम्यान मोफत कायदेविषयक सल्ला मार्गदर्शन सप्ताहाचे आयोजन

 

Health Benefits of Pulses | बनवण्यापूर्वी 6 तासांसाठी आवश्य भिजवा डाळ, दूर होतील पचनाशी संबंधीत या समस्या

 

Central Consumer Protection Authority (CCPA) | दिशाभूल करणार्‍या जाहिरांतींना लागणार लगाम ! सरकारने Naapatol आणि Sensodyne विरुद्ध जारी केला आदेश