Anti Corruption Bureau (ACB) Pune | 3 हजार रुपयांची लाच घेताना महावितरण कंपनीचा कार्यकारी अभियंता अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – इलेक्ट्रीक पोल (Electric Pole) बदलून देण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागून 3 हजार रुपये लाच स्विकारताना (Pune Bribe Case) महावितरण कंपनीच्या (MSEDCL) कार्यकारी अभियंत्याला (Executive Engineer) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau (ACB) Pune) अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. हेमचंद्र हरी नारखेडे Hemchandra Hari Narkhede (वय-57) असे ताब्यात घेण्यात आलेल्या कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) महावितरणच्या मंचर कार्यालयात (Manchar MSEDCL Office) ही कारवाई केली.

 

कार्यकारी अभियंता हेमचंद्र हरी नारखेडे याच्या विरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात (Manchar Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार (Prevention of Corruption Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 38 वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Pune)  तक्रार दिली होती.

तक्रारदार हे ठेकेदार (Contractor) असून त्यांनी मंचर येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयाकडे इलेक्ट्रीक पोल बदलून मिळण्यासाठी अर्ज केला होता. हा अर्ज कार्यकारी अभियंता हेमचंद्र नारखेडे यांच्याकडे गेला होता. नारखेडे याने पोल बदलून देण्याच्या मोबदल्यात 5 हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तडजोडीअंती तीन हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी 12 मे रोजी पुणे एसीबीकडे (Pune ACB) तक्रार केली. त्यानुसार पडताळणी केल्यानंतर गुरुवारी मंचर येथील कार्यालयात सापळा रचला. त्यावेळी तक्रारदार यांच्याकडून तीन हजार रुपयांची लाच स्विकारताना नारखेडे याला ताब्यात घेण्यात आले.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे युनिटच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे (Police Inspector Shriram Shinde) करीत आहेत.

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Pune | MSEDCL executive engineer caught taking anti-corruption bribe of Rs 3,000

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nitesh Rane | नितेश राणेंचा संभाजीराजे छत्रपतींना सवाल; म्हणाले – ‘औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देणाऱ्यांसोबत जायचं की नाही ते ठरवा’

 

Diabetes Diet | भात खावून सुद्धा कंट्रोल राहील डायबिटीज, केवळ करा ‘हे’ एक काम; जाणून घ्या

 

Dearness Allowance Hike | खुशखबर ! ‘या’ सरकारी कर्मचार्‍यांना दुहेरी फायदा; सरकारने वाढवला 14% डीए; 10 महिन्यांचा एरियरही मिळणार

 

Dearness Allowance Hike | खुशखबर ! ‘या’ सरकारी कर्मचार्‍यांना दुहेरी फायदा; सरकारने वाढवला 14% डीए; 10 महिन्यांचा एरियरही मिळणार