
Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुणे मनपातील सहायक आयुक्त सचिन तामखेडेच्या घरी सापडली साडेनऊ लाखांची कॅश, आज न्यायालयात करणार हजर
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption Bureau (ACB) Pune | ड्रेनेज लाईनच्या कामाच्या बिलांच्या मंजुरीसाठी ठेकेदाराकडून १५ हजार रुपयांची लाच घेताना पकडलेल्या सहायक आयुक्ताच्या (PMC Assistant Commissioner) घरी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) घेतलेल्या झडतीत तब्बल साडेनऊ लाख रुपयांची रोकड आढळून आली आहे. हे पैसे कोठून आले, याचा तपशील ते देऊ न शकल्याने पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे. सहायक आयुक्त सचिन चंद्रकांत तामखेडे Assistant Commissioner Sachin Chandrakant Tamkhede (वय ३४), कनिष्ठ अभियंता अनंत रामाभाऊ ठोक Junior Engineer Anant Rambhau Thok (वय ५२) व शिपाई दत्तात्रय मुरलीधर किंडरे Peon Dattatraya Muralidhar Kindre (वय ४७) या तिघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री अटक (Arrest) केली होती.
तक्रारदार ठेकेदाराने (PMC Contractor) कोथरुड भागात ड्रेनेज लाईन (Drainage Line) टाकण्याचे काम मिळाले होते. या कामाचे बिल (Work Bill) कोथरुड क्षेत्रीय कार्यालयात (Kothrud Bavdhan Regional Office) सादर केले होते. या बिलाला मंजुरी मिळावी, यासाठी तक्रारदार ठेकेदाराने सहायक आयुक्त तामखेडे याची भेट घेतली. तेव्हा त्याने २५ हजार रुपयांची लाच मागितली (Pune Bribe Case). ठेकेदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करताना तडजोडीअंती तामखेडे याने १५ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली.
त्यानुसार कोथरुड क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी सापळा रचला होता.
तक्रारदार तामखेडेकडे गेले असता त्यांनी लाचेची रक्कम कनिष्ठ अभियंता ठोक याच्याकडे देण्यास सांगितले.
ठोक याने ही रक्कम शिपाई किंडरे याच्याकडे देण्यास सांगितले.
त्यानुसार तक्रारदाराकडून १५ हजार रुपये स्वीकारताना किंडरे व इतर दोघांना पकडण्यात आले.
त्यानंतर तिघांच्या घरावर छापा टाकण्यात आला.
त्यात तामखेडे याच्या घरी तब्बल साडेनऊ लाख रुपयांची रोकड आढळून आली.
हे पैसे कोढून आले, याचे कोणतेही स्पष्टीकरण तामखेडे देऊ शकला नाही.
त्यामुळे पोलिसांनी ते जप्त केले आहेत. या तिघांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Pune | Nine and a half lakh cash found in the house of Pune Municipal Assistant Commissioner Sachin Tamkhede, will appear in court today
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- MSEDCL | राज्यावर वीज संकट? गुजरातची कंपनी म्हणते आधी 120 कोटींची थकबाकी द्या तरच वीज देऊ
- Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुणे मनपाच्या कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे, कनिष्ठ अभियंता अनंत ठोक, शिपाई दत्तात्रय किंडरे अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
- Sanjay Raut | काश्मीर फाईल्सवाल्यांनी आता ‘भाग सोमय्या भाग’ हा चित्रपट काढावा – संजय राऊत