Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुणे महापालिकेच्या उपायुक्तांकडे सापडले एक कोटी, पुणे एसीबीकडून FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) एका उपायुक्तांसह (Deputy Commissioner) त्यांच्या पत्नीवर अवैधरित्या सुमारे एक कोटी रुपयांची संपत्ती जमवल्याप्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) गुन्हा दाखल (FIR) केला आहे. पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त व त्यांच्या पत्नीवर कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) मंगळवारी (दि.5) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त विजय भास्कर लांडगे आकाशचिन्ह विभाग उपायुक्त (Deputy Commissioner of Sky Signs) विजय भास्कर लांडगे Vijay Bhaskar Landage (वय- 49) आणि त्यांच्या पत्नी शुभेच्छा विजय लांडगे Wife Shubhechcha Vijay Landage (वय-43) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सरकारतर्फे पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे (Police Inspector Bharat Salunkhe) यांनी फिर्याद दिली आहे.

 

उपायुक्त विजय लांडगे यांच्या घराची सकाळपासून झाडाझडती सुरु होती.
लांडगे आणि त्यांच्या पत्नीची पुणे एसीबीच्या (Pune ACB) अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली.
चौकशी दरम्यान विजय लांडगे व त्यांच्या पत्नी शुभेच्छा लांगडे
यांच्याकडे 1 कोटी 2 लाख 60 हजार 993 रुपयांची अधिकची संपत्ती आढळून आली. याचे प्रमाण 31.59 टक्के आहे.
लांडगे यांनी 24 फेब्रुवारी 2000 ते 19 फेब्रुवारी 2021 या कालावधीत एवढी अधिकची संपत्ती जमवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.
पुढील तपास पोलीस उप अधीक्षक शीतल घोगरे (Deputy Superintendent of Police Sheetal Ghogre) करीत आहेत.

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Pune | One crore found from Pune Municipal Corporation Deputy Commissioner, FIR from Pune ACB

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shinde-Fadnavis Government | सरकारचे नाथ ‘एकनाथ’, पण दबदबा ‘देवेंद्रां’चाच?

 

Pune Crime | पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ तडीपार

 

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप; म्हणाले – ‘माझे कायम खच्चीकरण’