Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुण्यातील पोलिस कर्मचारी 5 हजाराची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुण्यातील पोलिस कर्मचाऱ्याला 5 हजाराची लाच घेताना लाच लुचपत विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) रंगेहाथ पकडले आहे. दिलीप दत्तू फुंदे Dilip Dattu Funde (वय 34, पोलीस कॉन्स्टेबल, बंडगार्डन वाहतूक विभाग, पुणे शहर) असे लाच घेणाऱ्याचे नाव आहे.

 

पोलिस कर्मचारी दिलीप दत्तू फुंदे यांनी शुक्रवारी (दि. 18 फेब्रुवारी) 7 हजाराची लाच मागितली होती. तक्रारदार यांचे ताब्यातील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची जिनेओ मालवाहू गाडी ही इन्शुरन्स नसल्याने व रजिस्ट्रेशन संपल्याने बंडगार्डन वाहतूक विभाग (पुणे शहर) या ठिकाणी अडकवून ठेवली होती. सदरचे वाहन आरटीओकडे न पाठवण्यासाठी व कारवाई न करता सोडून देण्यासाठी दिलीप दत्तू फुंदे यांनी 7 हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती 5 हजार रुपये मागणी (Bribe Case) करून ते स्वीकारले असता त्यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे.

 

ही कारवाई पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे (SP Rajesh Bansode),
अप्पर अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) आणि अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgauda)
यांच्या मारदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदिप वऱ्हाडे, पो.ना. किरण चिमटे,
पो.ना. वैभव गिरी गोसावी, पो. काँ. अंकुश आंबेकर आणि चालक पो शि माळी यांच्या पथकाने केली आहे.

 

#Anti Corruption Bureau (ACB) Pune    #Anti Corruption Bureau  #Traffic Police  #Bribe Case  #SP Rajesh Bansode   #Addl SP Suraj Gurav   #Addl SP Suhas Nadgauda  #Pune Police   #Pune Traffic Police

 

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Pune | Pune ACB arrested traffic police dilip dattu funde while taking bribe of 5000

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा