Anti Corruption Bureau (ACB) Pune | राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील शिपाई आणि खासगी व्यक्ती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – परमिट रुमच्या लायसन्ससाठी (Permit Room License) लागणारी कागदपत्र संबंधित कार्यालयांकडून मिळवण्यासाठी त्यांना पत्र पाठवण्यासाठी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालय पुणे (Superintendent State Excise Office Pune) येथील शिपाई उत्तम किसन धिंदळे Peon Uttam Kisan Dhindale (वय – 45) आणि खासगी व्यक्ती विठ्ठल चव्हाण (Vitthal Chavan) यांना 5 हजाराची लाच घेताना (Accepting Bribe) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) सापळा रचून अटक केली आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) ही कारवाई मंगळवारी (दि.12) करण्यात आली.

 

याबाबत 25 वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Pune) तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी पडताळणी करुन आज (मंगळवार) सापळा रचून दोघांना अटक केली. तक्रारदार यांनी परमिटरूमचे लायसन्स मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. त्यासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र (No Objection Certificate) मिळण्याबाबत राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचे पत्र पोलीस आयुक्त कार्यालय (Police Commissioner Office) व वाहतूक शाखेला (Traffic Branch) पाठवण्यासाठी उत्तम धिंगळे याने पाच हजार रुपयांची लाच मागितली.

तक्रारदार यांनी याबाबत पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने सोमवारी पडताळणी केली असता उत्तम धिंदळे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सापळा रचण्यात आला. उत्तम धिंदळे याने लाचेची रक्कम खाजगी व्यक्ती विठ्ठल चव्हाण याच्यामार्फत घेताना रंगेहाथ पकडले.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक विजयमाला पवार (Deputy Superintendent of Police Vijaymala Pawar),
पोलीस हवालदार अंकुश माने, चालक पोलीस कॉन्स्टेबल अभिजित राऊत यांनी केली.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Pune | Soldiers in the state excise office and private individuals in the anti corruption net

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा