Anti Corruption Bureau (ACB) Thane | 7 हजाराची लाच घेताना तालुका कृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – कृषी केंद्रावर खरेदी-विक्री केलेल्या खत, बियाणे यांची काही ऑनलाईन नोंदी केली नसल्याचे कारणावरून तक्रारदार यांचे विरुद्ध कारवाई न करण्यासाठी 7 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) तालुका कृषी अधिकाऱ्याला (Taluka Agriculture Officer) ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Thane) रंगेहात पकडले. संतोष एकनाथ पवार Santosh Eknath Pawar (वय – 34) असे लाच घेताना रंगेहात पकडलेल्या तालुका कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Thane) ही कारवाई तालुका कृषी अधिकारी कार्यालय डहाणू येथे मंगळवारी (दि.28) दुपारी साडेतीनच्या सुमारास केली.

 

याबाबत 42 वर्षाच्या तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Thane) सोमवारी (दि.27) तक्रार केली होती. तक्रारदार यांचे कृषी केंद्र आहे. त्यांनी कृषी केंद्रावर खरेदी-विक्री केलेल्या खत, बियाणे यांची काही ऑनलाईन नोंदी केल्या नाहीत. याच कारणावरून तक्रारदार यांच्या विरुद्ध कारवाई न करण्यासाठी 10 हजार लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदार यांना आरोपी संतोष पवार याला लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी ठाणे एसीबी (Thane ACB) कडे तक्रार दिली.

त्यानुसार पडताळणी केली असता संतोष पवार याने तक्रारदार यांच्याकडे 10 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोड अंती सात हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. ठाणे एसीबीच्या पथकाने सापळा रचून संतोष पवार याला पंचासमक्ष सात हजार रुपये लाच घेताना तालुका कृषी अधिकारी कार्यालय, डहाणू येथे रंगेहात पकडण्यात आले.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले (SP Punjabrao Ugale),
अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर (Addl SP Anil Gherdikar),
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर पोलिस उपअधीक्षक नवनाथ जगताप (Deputy Superintendent of Police Navnath Jagtap)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास (Police Inspector Swapan Biswas),
पोलीस हवालदार संजय सुतार, अमित चव्हाण, विलास भोये, नितीन पागधरे, निशा मांजरेकर, पोलीस नाईक दिपक सुमडा,
सखाराम दोडे, महिला पोलीस नाईक स्वाती तारवी यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Thane | While taking bribe of Rs 7,000, the taluka agriculture officer was caught by the ACB

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा