Nashik News : लाच घेताना भाजप आमदाराचा भाऊ ACB च्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नळजोड देण्यासाठी 10 हजाराची लाच घेणा-या नाशिक महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयातील घरपट्टी विभागाच्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि.2) सायंकाळी सापळा रचून रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे हा लाचखोर लिपिक भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांचा सख्खा भाऊ आहे.

संजय नारसीभाई पटेल (वय 45) असे या लाचखोर लिपिकाचे नाव आहे. तक्रारदाराने नळजाेड मिळवण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केला हाेता. त्यावेळी पटेल याने त्यांच्याकडे 35 हजारांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली हाेती. तसेच पटेल यांच्याविरोधात अनेक तक्रारी नाशिक एसीबीकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार एसीबीने शुक्रवारी (दि. 2) सायंकाळी सापळा रचून पटेल याला तक्रारदाराकडून 10 हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुढील कारवाई सुरु आहे.