Anti Corruption Bureau । 2 हजारांची लाच घेताना पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – Anti Corruption Bureau । दाखल झालेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी म्हणून 2 हजार रुपयांची लाच घेताना शिराळा पोलीस ठाण्याचे (Shirala Police Station) सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (Assistant Sub-Inspector) हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau) जाळ्यात सापडले आहे. कुमार काका वायदंडे असं त्याचं नाव आहे. याप्रकरणी कुमार वायदंडे याच्या विरोधात शिराळा पोलिस ठाण्यात (Shirala Police Station) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

याबाबत माहिती अशी, शिराळा पोलीस ठाण्यात (Shirala Police Station) संबंधित फिर्याददाराच्या भावाविरोधात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी गुन्ह्याच्या तपासचं काम हे तेथील ASI कुमार वायदंडे याच्याकडे होता. तर या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी 2 ते 3 हजार रुपये खर्च येईल, असं कुमार वायदंडे यांनी (Kumar Vaidande) संबंधित तक्रारदार याला सांगितलं. आणि ASI याने लाचेची मागणी केली.

या दरम्यान, त्या संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची शाहनिशा करून या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau) पथकाने मंगळवारी (6 जुलै ) रोजी कुमार वायदंडे याच्या विरोधात शिराळा पोलिस ठाण्यात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून 2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले. त्याला अटक करण्यात आलीय.

ही कारवाई, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सूरज घाटगे,
पोलिस निरीक्षक गुरुदत्त मोरे, प्रशांत चौगुले, पोलिस अंमलदार सलिम मकानदार,
अविनाश सागर, सीमा माने, अजित पाटील, राधिका माने, संजय कलकुटगी,
रवींद्र धुमाळ, प्रीतम चौगुले, बाळासाहेब पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

 

Web Title : Anti Corruption Bureau | Assistant Sub Inspector caught taking a bribe of Rs 2 000 in shirala police satation of sangli

 

हे देखील वाचा

दिग्गज अभिनेता दिलीपकुमार यांचं निधन, मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

Modi Cabinet Expansion | नारायण राणे, प्रीतम मुंडे, शिंदेंसह संभाव्य मंत्री पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दाखल

Movies Live Blog | दिलीपकुमार यांनी महात्मा गांधींच्या अनुयायांसोबत घालवली होती येरवडा कारागृहात रात्र; पुण्याशी होते त्यांचे ऋणानुबंद

Modi Cabinet Expansion | मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारापुर्वीच मोठी खळबळ ! केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांचा राजीनामा