Anti Corruption Bureau | 30 हजाराची लाच मागणारा महावितरणचा अभियंता ACB च्या जाळ्यात

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – वीज ग्राहकाकडे 30 हजाराची लाच (Bribe) मागितल्याप्रकरणी लातूर येथील महावितरणच्या सहायक अभियंत्याविरोधात (MSEDCL Assistant Engineer) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) कारवाई केली आहे. या प्रकरणी शहरातील गांधी चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

मन्सूर नजीर शेख असे कारवाई झालेल्या सहायक अभियंत्याचे नाव आहे. तो लातूर येथील महावितरण शाखा क्रमांक 1 मध्ये कार्यरत आहे.

Pune Crime Branch Police | RTI कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेच्या पत्नीसह राजकीय पक्षाच्या हडपसर विधानसभा अध्यक्षाला अटक

मिळालेल्या माहितीनुसार, लातूरातील एका हाॅटेलचालकाने विद्युत मीटरमधून वीज प्रवाह काढून ताे थेट वीज वापरत असल्याचे समोर आले होते.
याबाबत कारवाई न करण्यासाठी आरोपी शेख याने 30 हजाराची लाच मागितली होती.
दरम्यान हाॅटेलचालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau) तक्रार दाखल केली.
तक्रारीची तडताळणी केल्यानंतर लाच मागितल्याचे निषपन्न झाले.
त्यानंतर महािवतरण कार्यालय परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Anti Corruption Bureau) सापळा लावला.
यावेळी तक्रारदार हाॅटेलचालकाने सदर लाचेची रक्कम देण्यासाठी कार्यालयात गेले हाेते.
मात्र, संशय आल्याने 30 हजारांची लाच स्वीकारण्यास शेख याने जाणिवपूर्वक टाळाळाट केली.
याप्रकरणी शेख याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

वेळेवर GST भरणार्‍या 54,000 व्यवसायिकांचा होणार सन्मान, यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त करदाते

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पाेलीस उपाधीक्षक माणिक बेंद्रे, पाेलीस निरीक्षक कुमार दराडे, बाबासाहेब काकडे, सहायक पाेलीस उपनिरीक्षक संजय पस्तापुरे, पाेलीस हवालदार लक्ष्मीकांत देशमुख, चंद्रकांत डांगे, माेहन सुरवसे, शिवकांता शेळके, संताेष गिरी, शिवशंकर कच्छवे, आशिष क्षीरसागर, संदीप जाधव, दीपक कलवले, रुपाली भाेसले, राजू महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Titel : Anti Corruption Bureau demand bribe thirty thousand crime against msedcl engineer

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IAS Transfer News | महाराष्ट्रातील 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रविण परदेशी, रणजीत कुमार यांचाही समावेश

दहिसरमध्ये दिवसाढवळ्या ज्वेलर्स दुकानावर दरोडा, गोळीबारात मालकाचा जागीच मृत्यू; परिसरात खळबळ

Maharashtra Coronavirus | राज्यात ‘कोरोना’ बाधितांचा आकडा वाढतोय, गेल्या 24 तासात 9,771 नवीन रुग्णांची नोंद