Anti Corruption Bureau Jalgaon | 2 हजाराची लाच घेताना तुरूंग रक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  दोन हजार रुपयांची लाच घेताना (Accepting Bribe) भुसावळ दुय्यम कारागृहातील (Bhusawal Secondary Jail) तुरुंग रक्षकाला जळगाव अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने (Jalgaon Anti Corruption Bureau) सापळा रचून अटक केली. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Jalgaon Anti Corruption Bureau) ही कारवाई सोमवारी (दि.15) दुपारी एकच्या सुमारास केली. अनिल लोटन देवरे (Anil Lotan Deore) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या तुरुंग रक्षकाचे नाव आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

तक्रारदार यांच्या नातेवाईकाविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल असून ते कारागृहात आहेत.
कैद्याला भेटू देण्यासाठी दुय्यम कारागृहातील तुरुंग रक्षक (Prison guard) अनिल देवरे यांनी 3 हजार रुपयांची लाच मागितली होती.
तडजोडीमध्ये दोन हजार रुपये देण्याचे ठरले होते.
त्यानंतर तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

 

लाचलुचपत विभागाने पडताळणी करुन सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भुसावळ कारागृहात सापळा रचला.
तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये घेताना देवरे यांना पंचासमक्ष अटक (Arrest) केली.
ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील (Deputy Superintendent of Police Shashikant Patil),
पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव (Police Inspector Sanjog Bachhav) यांच्या नेतृत्वात पथकाने केले.

 

Web Title : Anti Corruption Bureau Jalgaon | prison guards caught by acb while accepting bribe of rs 2000 in jalgaon

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Kiara Advani | विमानतळावरील ‘या’ लुकसाठी 52 हजारांचा टी-शर्टचा घेतला

Katrina Kaif | एका चित्रपटामागे तब्बल ‘इतके’ कोटी कमवते कतरीना कैफ, जाणून घ्या

Maharashtra Rains | अरबी सुमद्रात नवं संकट ! राज्यात पुढील 5 दिवस अतिशय महत्त्वाचे, मुंबई-पुण्याला IMD चा इशारा