Anti Corruption Bureau Jalgaon | 10 हजाराची लाच घेताना RTO चे दोन एजंट अँटी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  Anti Corruption Bureau Jalgaon | प्रवासी बस हस्तांतरण (Passenger bus transfer) करण्याच्या मोबदल्यात दहा हजाराची लाच घेताना (Accepting Bribe) आरटीओच्या दोन एजंटला (RTO Agent) जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Jalgaon) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे आरटीओ कार्यालयात खळबळ उडाली आहे. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई आरटीओ कार्यालयात सापळा रचून केली.

 

आरटीओ एजंट शुभम राजेंद्र चौधरी RTO Agent Shubham Rajendra Chaudhary (वय-23 रा. जळगाव) आणि राम भीमराव पाटील RTO Agent Ram Bhimrao Patil
(वय-37 रा. जळगाव) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या आरटीओ एजंटची नावे आहेत.
तक्रारदार हे त्यांची बस वडिलांच्या नावावर हस्तांतरण करण्यासाठी आरटीओ कार्यालयात आले होते.
बस हस्तांतरण करण्याच्या मोबदल्यात चौधरी आणि पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली.

 

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau Jalgaon) तक्रार केली.
विभागाने पंचासमक्ष पडताळणी केली असता चौधरी आणि पाटील यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार पथकाने आरटी कार्यालयात सापळा रचला.
तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना दोघांना रंगेहात पकडले.
त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील (Deputy Superintendent of Police Shashikant Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव
(Police Inspector Sanjog Bachhav), सहायक पोलीस निरीक्षक दिनेशसिंग पाटील (API Dinesh Singh Patil), सुरेश पाटील (API Suresh Patil),
पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक अहिरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्धन चौधरी, प्रवीण पाटील, महेश सोमवंशी,
नासिर देशमुक, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ यांनी ही कारवाई केली.

 

Web Title : Anti Corruption Bureau Jalgaon | Two RTO agents arrested for accepting bribe of rs 10000 jalgaon

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra School Reopen | शाळेची घंंटा वाजणार ! 1 ली ते 7 वी चे वर्ग सुरु करण्यास आरोग्य विभागाकडून ग्रीन सिग्नल; राजेश टोपे म्हणाले…

Pune Crime | अनैतिक संबंध ! आमच्या जागेत लफडे करता ? सुरक्षा रक्षकाचा खून करणार्‍या चौघांना कोंढवा पोलिसांकडून अटक

Gold Price Today | सोन्याच्या दरात किंचित वाढ पण दर 48 हजारांपेक्षा कमीच, जाणून घ्या आजचा भाव