Anti Corruption Bureau Kolhapur | 15 हजाराची लाच घेताना पोलीस अँटी करप्शनच्या जाळ्यात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  दक्षता जनजागृती सप्ताहाच्या (Vigilance Awareness Week) पहिल्याच दिवशी भ्रष्टाचाराविरोधात प्रबोधन करणाऱ्या कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Kolhapur) लाचखोर पोलिसालाच बेड्या (Police Arrest) ठोकल्या आहेत. लाचखोर पोलिसाने आम्ही लाच घेणार (Accepting Bribe) नाही अशी शपथ घेतली होती. 12 तास होत नाही तोच 15 हजार रुपयाची लाच घेताना पोलिसाला कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Kolhapur) रंगेहात पकडले. ही करावाई आज (बुधवार) शाहूपूरी पोलीस ठाण्यात (Shahupuri Police Station) करण्यात आली.

 

सागर कोळी (Sagar Koli) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे.
दोन गटातील वाद मिटवून तक्रारदाराला इनोवा गाडी (Innova car) परत मिळवून देण्यासाठी ही लाच मागितली होती. मिळालेल्या माहितीनुसार,
तक्रारदार यांचा जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांनी नितीन कदम यांची इनोवा गाडी वापरण्यासाठी आणली होती.
25 ऑक्टोबर रोजी माकडवाला वसाहत येथे राहणाऱ्या तानाजी आणि काही लोकांनी नितीन कदम आमचे पैसे देणे बाकी आहेत, असे सांगून तक्रारदाकडून जबरदस्तीने गाडी घेऊन गेले.

याबाबत तक्रारदार हे मित्रासह शाहूपुरी पोलीस ठाण्यात गाडी चोरीची तक्रार (Car theft complaint) देण्यासाठी गेले.
त्याठिकाणी पोलीस नाईक सागर कोळी याने दोन्ही गटांना एकत्र करुन वाद मिटवला. तक्रारदाराला गाडी परत करावी असे दुसऱ्या पार्टीला सांगितले.
गाडी परत मिळवून देण्यासाठी सागर कोळी यांनी 15 हजार रुपये लाच मागितली.
त्यातील 10 हजार रुपये लगेच घेतले. उर्वरित 5 हजार रुपयाची लाच घेताना आज कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Kolhapur) सापळा रचून कोळी यांना अटक केली.

 

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत (Deputy Superintendent of Police Adinath Budhwant) व पोलीस निरीक्षक सतीश मोरे
(Police Inspector Satish More) यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली.

 

Web Title : Anti Corruption Bureau Kolhapur | kolhapur acb arrests cop for taking rs 15000 bribe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Astro | घरात वटवाघुळचा प्रवेश ‘या’ अशुभ घटनांचा असू शकतो संकेत, व्हा सावध

7th Pay commission | दिवाळीपूर्वी येणार महागाई भत्त्याचा एरियर, समजून घ्या ऑक्टोबरच्या वाढीव पगाराचे गणित

Aryan Khan Drugs Case | आर्यन खानची सुटका पुन्हा लांबणीवर? आजची रात्र जेलमध्येच; कोर्टात नेमकं काय झालं, जाणून घ्या