Anti Corruption Bureau kolhapur | 5 हजाराची लाच घेताना बांधकाम विभागातील लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पेन्शन आईच्या नावावर करण्यासाठी बांधकाम खात्यातील कनिष्ठ लिपिकाला (junior clerk) 5 हजार रुपयाची लाच घेताना (Accepting Bribe) कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau kolhapur) सापळा रचून अटक केली आहे. कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau kolhapur) ही कारवाई गुरुवार (दि.28) केली आहे. या कारवाईमुळे बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे.

 

राजेश प्रकाश खाडे Rajesh Prakash Khade (वय-36 रा. रमणमळा कोल्हापूर) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे.
याप्रकरणी रविराज सावंत यांनी कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau kolhapur) तक्रार केली होती. तक्ररारदार रविराज सावंत यांच्या वडिलांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. वडिलांना मिळणारी पेन्शन आईच्या नावावर करण्यासाठी राजेश खाडे याने 5 हजार रुपये लाच मागितली.

 

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी कोल्हापूर लालचुपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
त्यानुसार पडताळणी केली असता खाडे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
तक्रारदार यांच्याकडून 5 हजार रुपयांची लाच स्विकारताना राजेश खाडे याला अटक केली.
ही कारवाई पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत (Deputy Superintendent of Police Adinath Budhwant) यांच्या पथकाने सापळा रचून केली.

 

Web Title :- Anti Corruption Bureau kolhapur | kolhapur bribe junior clerk of public works department arrested while accepting bribe of five thousand rupees

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aryan Khan Drugs Case | आर्यन खान ड्रग्ज केसमधील NCB चा ‘पंच’ किरण गोसावीला 8 दिवसांची पोलीस कोठडी

Aryan Khan Drugs Case | अखेर ‘मन्नत’ पूर्ण ! मुंबई उच्च न्यायालयाकडून आर्यन खानचा जामीन मंजूर (व्हिडिओ)

Pune Crime | अनधिकृत बांधलेल्या फ्लॅटची विक्रीकरुन 47 लाखांची फसवणूक, कोंढवा पोलिसांकडून मजहर शेखला अटक

Pune Crime Branch Police | बांधकाम व्यावसायिकांना माहिती अधिकार कायद्याची भीती दाखवत 1 कोटीची खंडणी मागणाऱ्या अ‍ॅड. राजेश बजाज, बापू शिंदेला गुन्हे शाखेकडून अटक

Anti Corruption Bureau Mumbai | 15 हजारीची लाच मागणारे अंमली पदार्थ विरोधी पथकातील 2 पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात