Anti Corruption Bureau Kolhapur | गुन्ह्यात मदत करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाकडे लाच मागणारा पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाकडे (Builder) 10 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या (Demand of Bribe) लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील (Laxmipuri Police Station) एका पोलीस कॉन्स्टेबलला (Police Constable) कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Kolhapur) अटक केली. ही कारवाई आज (सोमवार) करण्यात आली आहे. कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Kolhapur) केलेल्या या कारवाईमुळे लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे.

दिग्विजय पांडुरंग मर्दाने Digvijay Pandurang Mardane (वय-35 रा. शिंगणापूर, ता. करवीर) असे लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अनिल धीरज साखळकर Anil Dheeraj Sakhalkar (रा. नागाळा पार्क) यांनी कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau Kolhapur) तक्रार दिली आहे. मर्दाने यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागाळा पार्क (Nagala Park) येथील बांधकाम व्यावसायिक अनिल साखळकर यांच्याविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास दिग्विजय मर्दाने यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. गुन्ह्याच्या तपासात मदत करण्याचे आमिष दखवून मर्दाने याने व्यावसायिकाकडे 50 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी 25 हजार रुपये मर्दाने याने घेतले होते.

उर्वरित 25 हजार रुपयांसाठी मर्दाने यांनी बांधकाम व्यावसायिक साखरकर यांच्याकडे तगादा लावला होता. अखेर 25 हजार रुपयांपैकी 10 हजार रुपये देण्याचे ठरले. साखळकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत (Deputy Superintendent of Police Adinath Budhwant) यांची भेट घेऊन तक्रार दिली होती. 27 डिसेंबर रोजी पंचासमक्ष पडताळणी केली होती. त्यामध्ये यापूर्वी 25 हजार रुपये लाच स्विकारल्याचे आणि उर्वरित रक्कमेची मर्दाने याने मागणी केल्याचे स्पष्ट झाले त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल मर्दाने याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली.

Web Title : Anti Corruption Bureau Kolhapur | police constable Digvijay Pandurang Mardane arrested in bribe case in kolhapur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा

 

Vitamin And Mineral For Health | इम्यूनिटी, हाडे, मेंदू आणि डोळे मजबूत बनवतात व्हिटॅमिन A,B,C,D; ‘हे’ मिनरल सुद्धा आवश्यक, जाणून घ्या

Uric Acid | तुमच्या शरीरात होत असेल ‘ही’ समस्या, तर यूरिक अ‍ॅसिड वाढल्याचा असू शकतो संकेत; जाणून घ्या

Covid-19 vs Influenza | सर्दी-ताप, डोकेदुखीची लक्षणे ‘कोविड’ची आहेत की ‘फ्लू’ची, हे कसे ओळखावे? जाणून घ्या

Aloe Vera Juice Benefits | रोज प्याल एलोवेरा ज्यूस तर शरीराला होतील ‘हे’ 5 फायदे; जाणून घ्या

Maratha Reservation | उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धडकणार ‘लाँग मार्च’ (व्हिडिओ)

Mahavikas Aghadi | राष्ट्रवादी-शिवसेनेत वादाची ठिणगी ! आघाडी न करण्याची महापौरांची भूमिका

Vistadome Coach | मध्य रेल्वेवरील ‘व्हिस्टाडोम कोच’ना प्रचंड प्रतिसाद ! गेल्या 3 महिन्यात 20,407 प्रवाशांची नोंद, उत्पन्न रु.2.38 कोटी

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 41 हजारांपेक्षा जास्त रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी