Anti Corruption Bureau Maharashtra | 10 लाखाचे लाच प्रकरण ! पोलिस अधिकाऱ्यासह तिघे अँटी करप्शनच्या जाळ्यात; राज्य पोलिस दलात खळबळ

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption Bureau Maharashtra | पैशांचा पाऊस पाडतो, असे सांगून लोकांना लाखो रुपयांना फसविल्या प्रकरणात एका महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या जामीनासाठी मदत करण्यासाठी 10 लाखाची मागणी करून तडजोडीनंतर 7 लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रबिबंधक विभागाने Anti (Corruption Bureau Maharashtra) सापळा रचून दोघा खासगी व्यक्तीसह सहायक पोलीस निरीक्षकाला (API) रंगेहाथ पकडले.

 

अनिल घुगल API Anil Ghugal (वय ५२) असे या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. विद्युत वसानी व विशाल माकडे (दोघे रा. यवतमाळ) अशी अटक केलेल्या अन्य खासगी व्यक्तींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी यवतमाळ (Yavatmal) येथील एका ३१ वर्षाच्या महाराजाविरोधात लोहारा पोलीस ठाण्यात (Lohara Police Station) गुन्हा दाखल आहे. या महाराजाने अनेकांना पैशांचा पाऊस होईल,असे सांगून त्यांना लाखो रुपयांना लुबाडले आहे. १५ नोव्हेबर रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तक्रारदार याचा जामीन होण्यास मदत होईल, असा अहवाल न्यायालयात पाठविण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक अनिल घुगल याने तक्रारदार याच्याकडे १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे ६ डिसेंबर रोजी तक्रार (ACB Yavatmal) दिली होती.

 

 

 

त्यानुसार त्याची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी तडजोड करुन
सहायक पोलीस निरीक्षक अनिल घुगल याने 7 लाख रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य केले.
तसेच त्यानुसार यवतमाळमधील एस बी आय चौकात डॉलर मोबाईल शॉपी येथे
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Maharashtra) सापळा रचला.
यावेळी विशाल माकडे याच्यामार्फत ७ लाख रुपयांची लाच स्वीकारण्यात आली.
तसेच विद्युत वसानी याने त्यासाठी प्रोत्साहन दिल्याने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अमरावतीचे पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड (SP Vishal Gaikwad),
अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत (Addl SP Arun Sawant), पोलीस उपअधीक्षक संजय महाजन (DySP Sanjay Mahajan)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक किशोर म्हसवडे (DySP Kishor Mhaswade),
निरीक्षक विनोद कुजांम (Police Inspector Vinod Kunjam), कर्मचारी सुनिल जायभाये, शैलेश कडू यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

Web Title :- Anti Corruption Bureau Maharashtra | Anti Corruption Bureau (ACB) arrested assistant police inspector (API) in 10 lacs bribe case in yavatmal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा