Anti Corruption Bureau Mumbai | 15 हजारीची लाच मागणारे अंमली पदार्थ विरोधी पथकातील 2 पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption Bureau Mumbai | आर्यन खान ड्रग्स प्रकरणावरुन (Aryan Khan Drugs Case) मोठा गोंधळ उडाला असून या प्रकरणात अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. हा वाद सुरु असतानाच आता मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) अमली पदार्थ पथकातील (anti narcotics cell mumbai) दोन पोलीस कर्मचाऱ्यांना (two personnel) पान टपरी चालकाकडे लाच मागितल्याचा (Demanding Bribe) प्रकार समोर आला आहे. या दोघांविरोधात मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Mumbai) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी पान मसाला विक्रेत्याकडे गुटखा आणि पान मसाल्याचा धंदा सुरु ठेवण्यासाठी दरमहा 15 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाने पडताळणी केली असता दोघांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस शिपाई बाबासाब मधु सांगोलकर (Babasab Madhu Sangolkar) व पोलीस हवालदार इक्बाल बशिर शेख (Iqbal Bashir Sheikh) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहे. हे दोघे नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकात कार्यरत आहेत.
सीवूडस येथील रहवासी असलेल्या तक्रारदार यांचा पान मसाला व गुटखा विक्रीचा व्यवसाय आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पथकातील कर्मचारी सांगोलकर आणि शेख तिथे पोहचले.

सांगोलकर आणि शेख यांनी तक्रारदार मोहम्मद फैज निजामुद्दीन सय्यद याला पान मसालाचा
व्यवसाय पुढे सुरु ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दरमहा 15 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले.
तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau Mumbai) तक्रार दाखल केली होती.

 

Web Title :- Anti Corruption Bureau Mumbai | 2 policemen in the anti-narcotics cell mumbai police who demanded a bribe of Rs 15,000 in the anti-corruption trap

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Modi Government | दुचाकीवर 4 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी हेल्मेट सक्ती? मोदी सरकारने सूचना अन् हरकती मागवल्या

Krishi UDAN scheme | खुशखबर! शेतकर्‍यांसाठी मोदी सरकारने सुरू केली नवीन सुविधा, उत्पन्न दुप्पट करण्यात होईल मदत

Ahmednagar Crime | विम्याच्या रक्कमेसाठी स्वतःच्याच डुप्लिकेटला सर्पदंशाने मारलं अन् मेलेल्या भाच्यालाही केलं ‘जिवंत’; जाणून घ्या अहमदनगरमधील प्रकरण