Anti Corruption Bureau Mumbai | गेट जामीन करण्यासाठी लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक (PSI) एसीबीच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption Bureau Mumbai | दाखल गुन्ह्यात अटक करुन लागलीच पोलीस ठाण्यात जामीन देण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी करुन १० हजार रुपये स्वीकारणार्‍या पोलीस उपनिरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Mumbai) सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे.

 

विकास नामदेव लोखंडे Vikas Namdev Lokhande (वय ३३) असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. लोखंडे (PSI Vikas Lokhande) हा अंधेरी पूर्व येथील एम आय डी सी पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहेत.

 

तक्रारदार यांच्याविरुद्ध एम आय डी सी अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक करुन लागलीच पोलीस ठाण्यातच जामीन देण्यासाठी व कोर्टात न पाठविण्यासाठी विकास लोखंडे याने प्रथम २० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. याबाबत फिर्यादी यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे ८ डिसेंबर रोजी तक्रार केली होती.

 

या तक्रारीनुसार पडताळणी केली असताना विकास लोखंडे याने तक्रारदार याच्याकडे
तडजोडीअंती १० हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार एम आय डी सी पोलीस ठाण्यात तक्रारदाराकडून
१० हजार रुपयांची लाच (Anti Corruption Bureau Mumbai) स्वीकारताना
लोखंडे याला पकडण्यात आले. एम आय डी सी अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Anti Corruption Bureau Mumbai | ACB arrested police sub inspector vikas lokhande while taking bribe of 10 thousands in mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा