Anti Corruption Bureau Nagar | 40 हजाराची लाच घेणारे जातपडताळणी कार्यालयातील 2 एजंट अँटी करप्शनच्या जाळ्यात

राहुरी : पोलीसनामा ऑनलाइन –  जातपडताळणी प्रमाणपत्र (Caste Verification Certificate) देण्यात येऊ नये यासाठी दाखल करण्यात आलेल्या दाव्यात तक्रारदाराच्या बाजूनं निकाल लावण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या (Accepting Bribe) दोन एजंटना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून (Anti Corruption Bureau Nagar) अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई राहुरी (Rahuri) येथील स्टेशन रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये सापळा रचून (Anti Corruption Bureau Nagar) करण्यात आली आहे. हबीब बाबूभाई सय्यद Habib Babubhai Sayyed (वय-52) व शकील अब्बास पठाण Shakeel Abbas Pathan (वय-43) असे लाच घेताना अटक करण्यात आलेल्या दोन एजंटची नावे आहेत.

जात पडताळणी कार्यालयात तीन इसमांनी खोटे जातीचे दाखले काढून जातपडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज करेले होते.
त्याचे जातपडताळणी प्रमाणपत्र देऊन नये यासाठी तक्रारदाराने दावा दाखल केला होता.
या दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजून लावून देतो असे सांगून हबीबर सय्यद याने कार्यालयातील अधिकाऱ्यांना एक लाख रुपये द्यावे लागतील.
असे सांगून तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली.

 

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau Nagar) तक्रार दाखल केली.
त्यानंतर 13 ऑक्टोबरला तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली.
तडजोडीअंती 80 हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यातील 40 हजार रुपयांचा पहिला हाप्ता आज देण्यात येणार होता.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राहुरी स्टेशन रस्त्यावरील (Rahuri Station Road) एका हॉटेलमध्ये सापळा रचून लाच घेताना दोन एजंटला रंगेहाथ पकडले.

ही कारवाई नगर लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर (Deputy Superintendent of Police Harish Khedkar), पोलीस निरीक्षक प्रशांत सपकाळे
(Police Inspector Prashant Sapkale), पोलीस नाईक रमेश चौधरी, हवालदार रवींद्र निमसे, वैभव पांढरे, चालक पोलीस हवालदार हरुन शेख यांनी ही कारवाई केली आहे.

 

Web Title : Anti Corruption Bureau Nagar | 2 agents in the caste verification office who took a bribe of Rs 40,000 in the trap of anti-corruption at rahuri

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | लेफ्टनंट कर्नल महिलेच्या आत्महत्येप्रकरणी ब्रिगेडियर विरुद्ध गुन्हा दाखल; अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली होती धमकी

Anti Corruption Bureau Pune | पुण्यात 8 लाखाच्या लाच प्रकरणी जात पडताळणी समितीचा उपायुक्त नितीन ढगे ‘लाच लुचपत’च्या जाळयात; प्रचंड खळबळ

Weight Loss Tips | वाढते वजन नियंत्रित करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 सोप्या टिप्स; जाणून घ्या