Anti Corruption Bureau | ठाकरे गटातील आणखी एक आमदार अ‍ॅन्टी करप्शनच्या रडारवर; चौकशीला हजर राहण्याचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption Bureau | शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यानंतर आता आणखी एका आमदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नोटीस मिळाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे राजन साळवी यांना अ‍ॅन्टी करप्शनची (Anti Corruption Bureau) नोटीस आली आहे. या नोटिशीमध्ये मालमत्तेसंदर्भात उल्लेख केला आहे. त्यांना 5 तारखेला अलिबाग येथील अ‍ॅन्टी करप्शन कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

 

यापूर्वी बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने वैभव नाईक यांना नोटीस पाठवली होती.
त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. वैभव नाईक यांनी यापूर्वीच रत्नागिरी एसीबी कार्यालयाला मेल करून वेळ मागून घेतला आहे.
नाईक यांनी त्यानंतर कुडाळ इथल्या अ‍ॅन्टी करप्शनच्या कार्य़ालयावर मोर्चादेखील काढला होता.
यानंतर नीलेश राणे यांनी काढलेल्या संविधान बचाव रॅलीमध्ये प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हे नेते सहभागी झाले होते.
यावेळी वैभव नाईक यांच्यावर सरकारकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता.

 

या सर्व घडामोडींदरम्यान राजन साळवी यांनादेखील अ‍ॅन्टी करप्शनची नोटीस आली आहे. या नोटिशीमध्ये त्यांना 5 डिसेंबर रोजी अलिबाग येथील कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
या नोटिशीनंतर राजन साळी यांची अद्याप प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

 

Web Title :- Anti Corruption Bureau | now rajan salvi get anti corruption bureau notice konkan news marathi updates

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Power Supply Off | शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरात उद्या (रविवार) सकाळी ‘या’ वेळेत होणार बत्ती गूल

Raj Thackeray | ‘राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू; पण माझा महाराष्ट्र सैनिक…’ – राज ठाकरे

Bharosa Cell Pune | पती-पत्नीमध्ये दुरावा वाढतोय; दर अडीच तासाला भरोसा सेलमध्ये एक तक्रार दाखल

Railway IRME Exam-UPSC | केंद्रीय लोकसेवा आयोगावर मोठी जबाबदारी; आयोजित करणार रेल्वे भरतीच्या ‘या’ परीक्षा