Anti Corruption Bureau Pune | पुण्यातील लाचखोर उपायुक्त नितीन ढगेच्या घरात सापडले 2.81 कोटींचं ‘घबाड’; ‘बेनामी’चा होणार पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  तक्रारदारांच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करुन ते वैध करण्यासाठी उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य नितीन चंद्रकांत ढगे Nitin Chandrakant dhage (वय-40) यांना 1 लाख 90 हजार रुपयांची लाच (Accepting Bribe) घेताना पुणे लाचलुचपत प्रतबिंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau Pune) पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी रात्री 9.40 वाजता वानवडी (wanwadi) येथील ढगे यांच्या घराजवळ सापळा रचून अटक करण्यात आली. त्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक (Anti Corruption Bureau Pune) विभागाच्या अधिकाऱ्यांनी ढगे यांच्या राहत्या घराची झडती घेतली असता तब्बल पावणे तीन कोटी रुपयांचे घबाड पथकाच्या हाती लागले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

2 कोटी 81 लाख 89 हजार रुपयांची मालमत्ता

नितीन ढगे यांना अटक केल्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau Pune) पथकाने त्यांच्या राहत्या घराची रात्रभर झडती घेतली.
रविवारी त्यांच्या घराची झडती संपली. या झडतीमध्ये रोख 1 कोटी 28 लाख 49 हजार रुपये, मालमत्तांची कगादपत्रे यासह 2 कोटी 81 लाख 89 हजार रुपयांची मालमत्ता मिळून आली आहे.
कारवाई दरम्यान आढळून आलेल्या रकमेपैकी किती रक्कम वैध आणि किती अवैध आहे याची तपासणी सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

काय आहे प्रकरण ?

तक्रारदार यांच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता.
ते प्रमाणपत्र वैध करण्याकरीता ढगे याने 8 लाख रुपयांची लाच (Anti Corruption Bureau Pune) मागितली.
तक्रारदारांनी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली.
त्यात ढगे यांनी तडजोड करुन 3 लाख रुपये लाच मागून तडजोडीत 2 लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर तक्रारदार यांना ढगे यांनी पैसे देण्यासाठी वानवडीतील आपल्या निवासस्थानाजवळ बोलाविले होते.
त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune) सापळा रचला.
तक्रारदाराकडून प्रत्यक्षात 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेताना ढगे यांना पकडण्यात आले.
वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली.

 

दरम्यान, नितीन ढगेंची अनेक ठिकाणी बेनामी प्रॉपर्टी असल्याची चर्चा रंगली आहे. ढगे यांच्या मुळ गावी आणि इतर ठिकाणांवर प्रॉपर्टीची माहिती घेण्यात येत आहे.
अ‍ॅन्टी करप्शनचे अधिकारी त्याची देखील माहिती घेत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SB Rajesh Bansode), अप्पर अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgauda) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे , पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे, पो.शि.अंकुश आंबेकर, पो.शि. सौरभ महाशब्दे, चालक पो.शि. चंद्रकांत कदम यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title : Anti Corruption Bureau Pune | 2.81 crore scam found in the house of corrupt Deputy Commissioner Nitin Chandrakant Dhage in Pune; Anonymous will be exposed by ACB pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | दसर्‍याच्या दिवशी दारुला पैसे न दिल्याने आईचा केला खून; पुण्याच्या नर्‍हे येथील घटनेतील मुलाला पोलिसांनी केले अटक

Chronic Backache | अचानक त्रास देऊ लागली कंबरदुखी, तर व्हा सावध; असू शकतात ‘ही’ 9 कारणे

Maruti लवकरच लाँच करणार ऑफ रोड SUV Jimny Jeep जी देणार Mahindra Thar ला टक्कर, जाणून घ्या संपूर्ण रिपोर्ट