Anti Corruption Bureau Pune | 15 हजाराची लाच घेताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील 2 लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सुशिक्षित बेरोजगार इंजिनियरचे शासकीय लायसन्सचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठवण्यासाठी 25 हजार रुपये लाच मागून 15 हजार स्विकारताना (Accepting Bribe) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे (Maharashtra Jeevan Pradhikaran) कार्यालयातील दोन लिपिकांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune) रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (शुक्रवार) करण्यात आली असून दोघांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune) केलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

कनिष्ठ लिपिक तानाजी गोविंदराव दबडे Tanaji Govindrao Dabde (वय-50) आणि प्रथम लिपिक विलास दगडू तिकोणे Vilas Tikone (वय-50) अशी लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या लाचखोर लिपिकांची नावे आहेत. याप्रकरणी 45 वर्षाच्या व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

 

तक्रारदार यांचा मुलगा इंजिनियर (Engineer) असून त्याचा सुशिक्षित बेरोजगार इंजिनियरचे शासकीय लायसन्सचा प्रस्ताव (Government license proposal) वरिष्ठांकडे पाठवायचा होता. प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग एक येथील कार्यकारी अभियंता कार्यालयातील लिपिक विलास तिकोणे याने तक्रारदार यांच्याकडून 15 हजार रुपयांची लाच स्विकारली. त्यानंतर अधीक्षक अभियंता कार्यालयातील कनिष्ठ लिपिक तानाजी दबडे याने प्रस्ताव मंजूरीस ठेवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपयांची लाच मागितली.

 

 

तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर विभागाने पडताळणी केली.
त्यावेळी तानाजी दबडे याने अधीक्षक अभियंता यांच्याकडे प्रस्ताव
मंजुरीस ठेवण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
तर आरोपी तिकोणे याने दबडे याला लाच मागण्यास प्रोत्साहीत केले.
दबडे याने तडजोड करुन 15 हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत विभागाने दोघांना ताब्यात घेतले.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav),
सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgauda) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

 

Web Title :- Anti Corruption Bureau Pune | 2 clerks in Maharashtra Jeevan Pradhikaran office caught by Anti Corruption Bureau Pune taking bribe of 15000

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा