anti corruption bureau pune | वेल्हा येथील तलाठी 8 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   जागेचा उतारा देण्यासाठी आणि जागा खरेदीनंतर सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी तलाठ्याला 8 हजार रुपयांची लाच घेताना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (anti corruption bureau pune) रंगेहात पकडले आहे. मुकुंद त्रिंबकराव चिरटे ( वय 34) असे पकडलेल्या तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

मुकुंद चिरटे हे कोदवडी (वेल्हा) येथे तलाठी आहेत.
यातील तक्रारदार यांच्या संस्थेने वेल्हा आसनी येथे 20 गुंठे जागा विकत घेतली आहे.
त्यांनी जागा खरेदी करण्यापूर्वी सदर जागेचा उतारा देण्यासाठी व खरेदीनंतर सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी तलाठी कार्यालयात संपर्क केला होता.
त्यावेळी लोकसेवक मुकुंद यांनी 10 हजार रुपयांची लाचेची मागणी केली.
याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती.
त्याची पडताळणी करण्यात आली.
त्यात लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार आज सापळा कारवाईत लोकसेवक मुकुंद यांना तडजोडीअंती 8 हजार रुपयांची लाच घेताना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (anti corruption bureau pune) रंगेहात पकडले आहे.

 

Web Title : anti corruption bureau pune | acb arrest Talathi of Velha while taking bribe of Rs 8,000

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Anti-Corruption Bureau | 40 हजाराची लाच घेणारा सरपंच ACB जाळ्यात; आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा

pimpri chinchwad police | न्यायालयात बनावट जामीनदार उभे करुन गुन्हेगारांना जामीन; 6 जणांना अटक