Anti Corruption Bureau Pune | पुणे अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या कोल्हापूरमध्ये 11 लाखाच्या लाच प्रकरणी प्रांताधिकारी ‘प्रधान’ आणि सरपंच ‘डवर’ला ACB कडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption Bureau Pune | दिलेल्या नोटीसप्रमाणे कारवाई न करता नोटिसा परत घेण्यासाठी 11 लाखाच्या लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून 5 लाख 50 हजार रूपये घेतल्याप्रकरणी पुणे अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या (Anti Corruption Bureau Pune) कोल्हापूर युनिटने (Kolhapur News) राधानगरी-कागल (Radhanagri-Kagal) उपविभागाचे प्रांताधिकारी (Prantadhikari) आणि फराळी गावाच्या सरपंचास (Sarpanch) ताब्यात घेतले आहे. अ‍ॅन्टी करप्शनच्या या कारवाईमुळे संपुर्ण पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

प्रसेनजीत बबनराव प्रधान Prasenjit Babanrao Pradhan (49, प्रांताधिकारी, राधानगरी-कागल उपविभाग, कोल्हापूर, सध्या रा. फ्लॅट नं. 303, सी विंग, विंसगेट अपार्टमेंट, न्यूज पॅलेस जवळ, कोल्हापूर. मुळ रा. घर नं. 450, मित्रनगर, नवघन कॉलेज रोड, बीड शहर, जि. बीड) आणि संदीप जयवंत डवर Sandeep Jaywant Dwar (41, सरपंच – फराळी ग्रामपंचायत, ता. राधानगरी. रा. मु.पो. लिंगाचीवाडी, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.

तक्रारदार यांचे क्रशर असून सदर व्यवसाय बंद करण्याबाबत ग्रामपंचायत फराळी व उपविभागीय अधिकारी राधानगरी-कागल यांच्या कार्यालयाकडून नोटीसा देण्यात आल्या होत्या. सदर नोटीसप्रमाणे कारवाई न करण्यासाठी आणि नोटिसा परत घेण्यासाठी फराळे गावचे सरपंच डवर यांनी स्वतःसाठी 1 लाख रूपये आणि प्रांताधिकारी प्रसेनजीत बबनराव प्रधान (Prantadhikari Prasenjit Babanrao Pradhan) यांच्यासाठी 10 लाख रूपयांची मागणी केली होती. प्रांताधिकारी प्रधान यांनी सरपंच डवर (Sarpanch Sandeep Jaywant Dwar) यांच्या लाच मागणीस दुजोरा देऊन सदरची लाच रक्कम डवर यांचेकडे देण्यास सांगितले होते. दरम्यान, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. त्याची एसीबीकडून दि. 8 आणि 9 जानेवारी 2022 रोजी पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये प्रधान आणि डवर हे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. (Anti Corruption Bureau Pune)

आज (रविवार) सरकारची पंचासमक्ष पहिला हप्ता म्हणून 5 लाख 50 हजार रूपये डवर याने घेतले. त्यास रंगेहाथ पकडण्यात आले.
त्यानंतर प्रांताधिकारी प्रधान यांना देखील एसीबीकडून ताब्यात घेण्यात आले आहे. पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे (SP Rajesh Bansode),
अप्पर अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav), अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgauda)
यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर एसीबीचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत (DySP Adhinath Budhwant),
पोलिस निरीक्षक नितीन कुंभार (Police Inspector Nitin Kumbhar), कर्मचारी अजय चव्हाण, शरद पोरे,
मयूर देसाई, रूपेश माने, अमर भोसले, विकास माने आणि नवनाथ कदम यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे संपुर्ण पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

 

 

Web Title :- Anti Corruption Bureau Pune | ACB arrests Prantadhikari Prasenjit Babanrao Pradhan and Sarpanch Sandeep Jaywant Davar-Dwar-Pune Anti-Corruption Department’s Kolhapur bribery case of Rs 11 lakh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Cyber Crime | बजाज फायनान्स कंपनीचे संजीव बजाज यांच्यासह तिघांना ईमेलद्वेरे 11.5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी

 

Railway Police | CSMT, कुर्ला रेल्वे स्थानकासह चार ठिकाणी आत्मघाती हल्ला करण्याचा फोन; जबलपूरच्या तरुणाला केली अटक

 

Pune Corona Updates | अत्यंत चिंताजनक ! पुण्यात गेल्या 24 तासात 4000 पेक्षा जास्त नवे कोरोना रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Modi Government | मोदी सरकारकडून ऊस उत्पादकांना मोठा दिलासा ! साखर कारखान्यांचा 8 हजार 400 कोटींचा प्राप्तिकर माफ