Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जमिनीचा फेरफार मंजूर करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच घेताना (Accepting Bribe) घोडेगाव येथील मंडल अधिकाऱ्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune) सापळा रचून अटक केली. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune) ही कारवाई आज (मंगळवार) घोडेगाव तहसील कार्यालयासमोर (Ghodegaon Tehsil Office) केली. मंडल अधिकारी (Divisional Officer) योगेश रतन पाडळे Yogesh Ratan Padle (वय-38), खासगी इसम लक्ष्मण सखाराम खरात Laxman Sakharam Kharat (वय-61) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

 

याप्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau Pune) 36 वर्षीय नागरिकाने तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या मामाच्या मुलाने जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीचा फेरफार मंजूर करण्यासाठी मंडल अधिकारी योगेश पाडळे याने दहा हजार रुपयांची लाच मागितली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी केल्यावर लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घोडेगाव तहसील कार्यालयासमोर सापळा रचला. तहसील कार्यालयासमोरील हॉटेलमध्ये मंगळवारी तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना योगेश पाडळे याला पकडण्यात आले. लक्ष्मण गायकवाड याने लाचेची मागणीस सहाय्य केले. म्हणून दोघांवर घोडेगाव पोलीस ठाण्यात (Ghodegaon Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav), अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgauda)
यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अलका सरग (Police Inspector Alka Sarg) करीत आहेत.

 

Web Title :- Anti Corruption Bureau Pune | ACB Pune action on mandal officer and one private person while taking bribe of 10 thousands

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Corona in Mumbai | थोडा दिलासा ! मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट, गेल्या 24 तासात 11,647 रुग्णांची नोंद

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 34 हजारांपेक्षाही जास्त नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Saving & Investment Tips | सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटसाठी खुप उपयोगी आहेत ‘या’ 7 टिप्स, लाभ घेण्यासाठी जाणून घ्या