Anti Corruption Bureau Pune | 85 हजार रुपयांची लाच घेताना एकजण अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; चाकण पोलीस ठाण्यातील अधिकारी ‘ACB’च्या रडारवर, पुणे-पिंपरी पोलिस दलात प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एका खासगी इसमाला 85 ते 90 हजार रुपयांची लाच घेताना (Accepting Bribe) पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune) रंगेहाथ पकडले आहे. पुणे लाचलुचप प्रतिबंधक विभागाने ही कारवाई (Anti Corruption Bureau Pune) केली असून या कारवाईमुळे चाकण पोलीस ठाण्यातील (Chakan Police Station) एक अधिकारी पुणे एसीबीच्या (Pune ACB) रडारवर आला आहे. ही लाच कोणत्या कारणासाठी घेतली हे अद्याप समजू शकले नाही.

चाकण पोलीस ठाण्यातील ‘त्या’ अधिकाऱ्याच्या संमतीनंतर खासगी व्यक्तीने लाच घेतल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, एका खासगी इसमाला 85 ते 90 हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस उप अधीक्षक श्रीहरी पाटील (DySP Shrihari Patil) यांनी पोलीसनामा ऑनलाईनशी बोलताना दिली. या व्यक्तीने एका पोलीस अधिकाऱ्यासाठी लाच घेतल्याची चर्चा आहे. मात्र, ज्या पोलीस अधिकाऱ्यासाठी लाच घेतली. तो अधिकारी सध्या तपासासाठी बीड येथे गेल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीकडे कसून चौकशी केली जात आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune) केलेल्या कारवाईमुळे पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav),
अप्पर अधीक्षक सुहास नादगौडा (Addl SP Suhas Nadgaud) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.

 

 

Web Title :- Anti Corruption Bureau Pune | Acb pune arrested one private person while taking bribe of 85000 in absence of psi chakan police station pimpri chinchwad police commissionerate

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Corona in Maharashtra | ‘मुंबईत पुन्हा इमारती सील होणार; शाळा अन् महाविद्यालयाबाबत 2 दिवसांत निर्णय होणार’ – आदित्य ठाकरे

 

Pune Corona | चिंताजनक ! पुण्यातील कोरोना रूग्णांमध्ये मोठी वाढ, गेल्या 24 तासात 225 पेक्षा अधिक नवे रूग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Crime | पुण्याच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून 5 कोटीच्या प्रकरणात खासगी सावकार नाना वाळके, अनिकेत हजारेला अटक

 

Maharashtra Government Guidelines | थर्टी फस्टच्या पार्टी आणि कार्यक्रमांच्या पार्श्वभुमीवर राज्य गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

 

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या 18 महिन्यांच्या थकीत DA एरियरवर लवकरच येऊ शकतो निर्णय, यांना मिळेल 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम?