Anti Corruption Bureau Pune | 1 लाखाचे लाच प्रकरण ! पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची (ACB) वडगाव मावळमध्ये मोठी कारवाई; प्रचंड खळबळ

पुणे : Anti Corruption Bureau Pune | मावळ तालुक्यातील साते गावात भंगार दुकानाच्या ना हरकत परवान्यासाठी १ लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune) ग्रामपंचायत सदस्याला रंगेहाथ पकडले. मात्र, सरपंच फरार झाला आहे. ऋषीनाथ आगळमे असे अटक केलेल्या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. दोघांविरुद्ध वडगाव मावळ पोलीस ठाण्यात (Wadgaon Maval Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराने साते गावात भंगाराचे दुकान सुरु केले होते. त्याच्याविरुद्ध  ग्रामपंचायतीत तक्रार केली. तेव्हा सरपंचाने या तक्रारदाराला बोलावून तू दुकान सुरु करण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी घेतली नाही. तेव्हा तक्रारदार यांनी ग्रामपंचायतीकडे ना हरकत परवान्यासाठी अर्ज केला. तेव्हा सरपंचाने ना हरकत परवान्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागितली. त्यावर तक्रारदारांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau Pune) धाव घेतली. या तक्रारीची पडताळणी करताना त्यांनी तडजोड करुन १ लाख रुपये घेण्याचे मान्य केले. त्यानुसार रविवारी दुपारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.

ऋषीनाथ आगळमे हा ग्रामपंचायत सदस्य लाचेची रक्कम घेण्यासाठी आला. तेव्हा तक्रारदाराकडून १ लाख रुपये स्वीकारताना त्याला पकडण्यात आले. त्याची चारचाकी गाडीही जप्त करण्यात आली. याची कुणकुण लागताच सरपंच मात्र फरार झाला आहे. वडगाव मावळ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा

LPG Price 1 Nov | ‘एलपीजी’ सिलेंडर 265 रुपयांनी महागला, दिवाळीपूर्वीच फुटला महागाईचा ‘बॉम्ब’

Pune Crime | धक्कादायक ! मित्राच्या पत्नीची अश्लील छायाचित्रे बनवणारा होमगार्ड ‘गोत्यात’; जाणून घ्या प्रकरण

Family Pension Rules | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! ‘फॅमिली पेन्शन’ची मर्यादा वाढवली, दरमहा मिळणार ‘एवढी’ रक्कम; जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Anti Corruption Bureau Pune | ACB Trap wadgaon maval sate gaon grampanchayat member and sarpanch one lakh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update