Anti Corruption Bureau Pune | दौंड तालुक्यातील यवतमध्ये तलाठयास 30 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शननं पकडलं

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune) यवत शहरात (yavat) कारवाई करत एका तलाठ्याला लाच घेताना रंगेहात पकडले आहे. एसीबीची (Anti Corruption Bureau Pune) कारवाई सुरू असून, यामुळे खळबळ उडाली आहे.  Anti-corruption caught taking bribe of Rs 30,000 in Yavat in Daund taluka

कुंडलिक नामदेव केंद्रे (वय 36) व शंकर दत्तू टुले (वय 33) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात (Daund Police Station) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

केंद्रे दौंडमधील (Daund) दहिटने येथे तलाठी आहेत.
तर शंकर हा खासगी व्यक्ती आहे.
यातील तक्रारदार यांच्या सातबारा भोगवटा वर्ग बदलण्यासाठी अर्ज केला होता.
त्यावेळी लोकसेवक कुंडलिक याने 35 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.
याबाबत त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली.
त्यानुसार सापळा कारवाईत तडजोडीअंती 30 हजार रुपयांची लाच घेताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

Web Title : Anti Corruption Bureau, Pune | Anti-corruption caught taking bribe of Rs 30,000 in Yavat in Daund taluka

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gopaisa | गोपैसाद्वारे ‘अर्नली’ या नवीन डील शेअरिंग प्लॅटफॉर्मची घोषणा

Modi Cabinet Expansion | केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांच्यासह 12 मंत्र्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्विकारला

Modi Cabinet Expansion | केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल; आतापर्यंत डॉ. हर्षवर्धन यांच्यासह 9 मंत्र्यांनी का दिला राजीनामा?