Anti Corruption Bureau Pune | 85 हजार रुपयांची लाच घेताना खासगी इसम अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; चाकण पोलिस ठाण्यातील PSI सह दोघांवर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एका खासगी इसमाला 85 हजार रुपयांची लाच घेताना (Accepting Bribe) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune) रंगेहाथ पकडले आहे. पुणे लाचलुचप प्रतिबंधक विभागाने ही कारवाई चाकण पोलीस ठाण्यात (Anti Corruption Bureau Pune) बुधवारी (दि.29) रात्री केली आहे. अटक करण्यात आलेल्या खासगी व्यक्तीने चाकण पोलीस ठाण्यातील (Chakan Police Station) एका पोलीस उपनिरीक्षकाच्या सांगण्यावरुन लाच घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

 

अखत्तर शेखावत अली शेख Akhtar Shekhawat Ali Shaikh (वय-35) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे (PSI Somnath Zende) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 27 वर्षाच्या तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau Pune) तक्रार केली आहे.

 

तक्रारदार यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज आला आहे. या अर्जावरुन कारवाई न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक झेंडे याने 70 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पुणे एसीबीने (Pune ACB) तक्रारीची पडताळणी केली असता खासगी इसम अखत्तर शेख याने झेंडे यांच्यासाठी 70 हजार आणि स्वत: साठी 15 हजार असे एकूण 85 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

बुधवारी चाकण पोलीस ठाण्यात पथकाने सापळा रचून अखत्तर शेख याला 85 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे याने शेख याला लाच घेण्यास मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने झेंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र अद्याप झेंडे यांना अटक करण्यात आलेली नाही. दोघांविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.
पुढील तपास पोलीस उप अधीक्षक क्रांती पवार (DySP Kranti Pawar) करीत आहेत.

 

Web Title :- Anti Corruption Bureau Pune | anti-corruption pune arrested private person while accepting a bribe of Rs 85,000; Crime against two including PSI Somnath Zende of Chakan police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Wedding Insurance | कोरोनामध्ये लग्न रद्द झाले असेल तर परत मिळतील पैसे, ₹ 7500 मध्ये 10 लाखांपर्यंत विमा कव्हर; जाणून घ्या

 

Employees Pension Scheme | 300% पर्यंत वाढू शकते पेन्शन ! 7500 रुपयांवरून वाढून 25000 रुपये होईल पेन्शन, जाणून घ्या गणित

 

Deccan Queen Express | पुणे-मुंबईच्या प्रवाशांनो कृपया लक्ष द्या ! 2 जानेवारी रोजी डेक्कन व डेक्कन क्वीन एक्सप्रेस रद्द