Anti Corruption Bureau Pune | 50 हजाराचे लाच प्रकरण ! पुणे अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकानं बारामती सेशन कोर्टातील पोलिसाला घेतलं ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑलनाइन – पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Anti Corruption Bureau Pune) आज बारामतीमधील (Baramati) एका पोलिस हवालदारास (Police Havaldar) लाच प्रकरणी ताब्यात घेतलं आहे. माणिक गदादे (Manik Gadade) असं पोलिसाचं नाव आहे. त्यांची नेमणुक बारामती सेशन कोर्टात (Baramati Session Court) गार्ड म्हणून करण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) मुख्यालयात कार्यरत असणार्‍या माणिक गदादे यांची काही दिवसांपुर्वीच बारामतीच्या सेशन कोर्टात गार्ड म्हणून डयुटी लावण्यात आली होती. दरम्यान, पुणे एसीबीच्या (Pune ACB) पथकानं काही वेळापुर्वी गदादे यांना लाच प्रकरणी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. (Anti Corruption Bureau Pune)

माणिक गदादे हे पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या (Pune Rural Police) मुख्यालयात कार्यरत आहेत. त्यांना काही दिवंसापुर्वी बारामती सेशन कोर्टात गार्डची डयुटी देण्यात आली होती. दरम्यान, त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी (Barshi, Solapur) येथून एक स्कॉर्पिओ ओढून आणली आणि स्कॉर्पिओ मालकाला त्या गाडीचा वापर दरोड्याच्या गुन्ह्यात झाल्याचं सांगितलं. स्कॉर्पिओ सोडून देण्यासाठी सर्वप्रथम गदादे यांनी 50 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. दरम्यान, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau Pune) तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची खातरजमा करण्यात आली. तडजोडीअंती 20 हजार रूपयांवर मांडवली करण्यासाठी माणिक गदादे तयार झाले.

कामकाजात अत्यंत हुशार असलेल्या माणिक गदादे यांना अ‍ॅन्टी करप्शन कारवाईचा संशय आल्याने त्यांनी लाच घेण्याचं टाळलं.
पण, 20 हजाराच्या लाचेची मागणी केल्याचं अ‍ॅन्टी करप्शनच्या चौकशीत निष्पन्न झालं होतं.
त्यामुळे पुणे अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकानं आज (मंगळवार) दुपारी माणिक गदादे यांना ताब्यात घेतलं आहे.
बारामतीमध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. बारामती सेशन कोर्टातील पोलिसानं भलताच उद्योग केल्याची चर्चा सध्या पुणे ग्रामीण पोलिस दलामध्ये सुरू आहे.

 

पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (ACB SP Rajesh Bansode), अप्पर अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav), अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgouda) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

 

Web Title :- Anti Corruption Bureau Pune | Bribery case of Rs 50,000! Pune Anti-Corruption Squad arrests Baramati Sessions Court police from pune rural police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nagar Urban Co-Op Bank | रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेवर घातले निर्बंध; खातेदारांना केवळ 10 हजार रुपये काढता येणार

PM Kisan Samman Nidhi Yojana | शेतकऱ्यांसाठी खूशखबर ! 10 वा हप्ता मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मोदी सरकारकडून जारी; जाणून घ्या

WhatsApp Disappearing Messages | ‘हे’ फीचर कसे करते काम, असे करा Enable आणि Disable, वाढेल फोनचा स्पीड