Anti Corruption Bureau Pune | अबब ! पुण्यातील उपायुक्त नितीन ढगेंच्या बंगल्यात कोटयावधीचं ‘घबाड’, ACB चे अधिकारी म्हणाले – ‘मध्यरात्रीपासून अद्यापही स्कुटनी सुरूय’

पुणे : Anti Corruption Bureau Pune | जात प्रमाणपत्र पडताळणी करुन ते वैध करण्यासाठी 8 लाख रुपयांची लाच मागून प्रत्यक्षात 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune) उपायुक्ताला रंगेहाथ पकडले आहे. नितीन चंद्रकांत ढगे Nitin Chandrakant dhage (वय 40) असे या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्ताचा नाव आहे. या कारवाईनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ढगे यांच्या बंगल्याची झडती घेतली त्यावेळी पथकाला घरामध्ये मोठ्या प्रमाणात रोकड सापडली आहे.

अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgauda) यांनी यासंदर्भात सांगितले की, नितीन ढगे यांच्यावर सापळा कारवाई केल्यानंतर त्यांच्या राहत्या घराची झडती घेण्यात आली आहे. या झडतीमध्ये ढगे यांच्या घरामध्ये तब्बल सव्वा कोटी रुपयांची रोकड सापडली आहे. या रकमेपैकी किती रक्कम वैध आणि किती अवैध आहे याची तपासणी अद्यापही सुरू आहे.

LIC Saral Pension Plan | एलआयसीचा नवीन प्लान ! एकदा प्रीमियम भरून दरमहिना मिळवा 12000 रुपये; सोबतच सहज मिळेल कर्ज

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात नितीन ढगे हे उपायुक्त तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आहेत.
तक्रारदार यांच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता.
ते प्रमाणपत्र वैध करण्याकरीता ढगे याने 8 लाख रुपयांची लाच (Anti Corruption Bureau Pune) मागितली.
तक्रारदारांनी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.
तक्रारीची पडताळणी करण्यात आली.
त्यात ढगे यांनी तडजोड करुन 3 लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर तक्रारदार यांना ढगे यांनी पैसे देण्यासाठी वानवडीतील आपल्या निवासस्थानाजवळ बोलाविले होते.
त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune) सापळा रचला.
तक्रारदाराकडून 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेताना ढगे यांना पकडण्यात आले.
वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SB Rajesh Bansode), अप्पर अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgauda) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे , पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे, पो.शि.अंकुश आंबेकर, पो.शि. सौरभ महाशब्दे, चालक पो.शि. चंद्रकांत कदम यांच्या पथकाने केली आहे. ढगेंच्या बंगल्यात सापडलेल्या संपत्तीची स्कुटनी अद्यापही सुरू असल्याचं रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अ‍ॅन्टी करप्शनकडून  सांगण्यात आलंय.

हे देखील वाचा

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल डिझेलच्या दरातील भाववाढीचा आलेख अजूनही चढताच

Gold Mutual Fund | अवघ्या 500 रुपयात खरेदी करू शकता सोने, Gold मध्ये करा गुंतवणूक; मिळेल शानदार रिटर्न

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Anti Corruption Bureau Pune | House search of Nitin Chandrakant dhage is going on by Anti Corruption Bureau Pune till now acb found 1.25 crores

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update