Anti Corruption Bureau Pune | पिंपरी चिंचवड महापालिकेतील 2 कर्मचारी अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; खळबळ प्रचंड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थेरगाव करसंकलन कार्यालयातील (Thergaon Tax Collection Office) दोन कर्मचाऱ्यांना लाच घेताना (Accepting Bribe) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune) रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune) स्थायी समितीच्या अध्यक्षावर केलेल्या कारवाईची आठवण ताजी झाली आहे. आज झालेल्या कारवाईमुळे पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडाली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation – PCMC) थेरगाव करसंकलन कार्यालयातील दोन लिपीक यांना लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही लाच त्यांनी कोणत्या कारणासाठी घेतली हे अद्याप समजू शकले नाही. एसीबीने (ACB Pune) दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरु आहे.
या कारवाई संदर्भात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी दोघांना ताब्यात घेतल्याचे सांगितले.
तसेच अद्याप कारवाई सुरु असून ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांकडे चौकशी सुरु असल्याचे सांगितले.
पथकाने ही कारवाई थेरगाव करसंकलन कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरती शुक्रवारी (दि.17) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास केल्याचे समजतेय.
Web Title :- Anti Corruption Bureau Pune | Pimpri Chinchwad Municipal Corporation Two employees arrested for Accepting Bribe pcmc area
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | एमपीएससी करणाऱ्या आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या, पुण्यात प्रचंड खळबळ