Anti Corruption Bureau Pune | पुण्यातील पोलिस कर्मचारी लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption Bureau Pune | राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप (ST Workers Strike) पुकारल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी बसेसला (Private buses) प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याच दरम्यान पोलिसांकडून लाचेची मागणी होत असल्याचे समोर आले आहे. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स बसेसवर कारवाई न करण्यासाठी लोणी काळभोर वाहतूक शाखेच्या (Loni Kalbhor Traffic Branch) पोलीस शिपायाला 5 हजाराची लाच घेताना (Accepting Bribe) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

 

सुहास भास्कर हजारे Suhas Bhaskar Hazare (वय-35) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. याप्रकरणी 27 वर्षीय ट्रॅव्हल्स एजन्सीच्या मॅनेजरने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau Pune) तक्रार केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.4) लोणी काळभोर टोलनाक्याजवळील कवडीपाट येथे करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांच्या एजन्सीच्या बसेस स्वारगेट ते सोलापूर (Swargate to Solapur) अशी प्रवाशांची वाहतूक करतात. तक्रारदार यांच्या ट्रॅव्हल्सच्या बसेसवर कारवाई न करण्यासाठी हजारे याने दर महिना 6 हजार रुपये लाचेची मागणी केली.

 

तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau Pune) तक्रार केली. पथकाने पडताळणी केली. त्यावेळी सुहास हजारे याने ट्रॅव्हल्सवर कारवाई न करण्यासाठी 6 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीत 5 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले. पथकाने आज कवडीपाट येथे सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून 5 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav), सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgauda)
यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अलका सरग (Police Inspector Alka Sarg) करीत आहेत.

 

Web Title :- Anti Corruption Bureau Pune | Police personnel in Pune caught taking bribe of 5000 in loni kalbhor area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PM Kisan | खुशखबर ! 1 आठवड्यानंतर शेतकर्‍यांच्या खात्यात येतील 4000 रुपये, राज्य सरकारांनी केली आहे तयारी, चेक करा स्टेटस

Vicky Katrina Wedding | कतरीना कैफच्या घराबाहेर स्पाॅट झाला विकी कौशल; एवढ्या रात्री येण्याचं कारण ?

Money Laundering Case | ‘हवाला’च्या माध्यमातून हाँगकाँगला पाठविले तब्बल 1100 काेटी रुपये; CA ला अटक