Anti Corruption Bureau Pune | 1 लाखाची लाच मागणाऱ्या लाचखोर महिला उपनिरीक्षकला (PSI) पोलीस कोठडी; जाणून घ्या कोर्टामध्ये काय झालं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तक्रार अर्जावरुन बलात्काराचा (Rape) गुन्हा (FIR) दाखल न करण्यासाठी एक लाखांची लाच मागून तडजोडीत 70 हजार रुपये स्विकारताना (Accepting Bribe) महिला पोलीस उपनिरीक्षकासह (PSI) सहायक पोलीस उपनिरीक्षकाला (ASI) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune) गुरुवारी (दि.2) रंगेहात पकडले. हेमा सिद्राम सोळुंके Hema Siddharam Solunke (वय-28 रा. कृष्णानगर, सांगवी, मुळ रा. मुपो सावनगिरा, ता. निलंगा) असे अटक करण्यात आलेल्या महिला उपनिरीक्षकाचे नाव आहे. आरोपी महिला अधिकाऱ्याला न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी (police custody) सुनावण्यात आली. (Anti Corruption Bureau Pune)

 

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करताच सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक बाळकृष्‍ण देसाई (Ashok Balkrishna Desai) लाचेच्या रक्कमेसह फरार झाला आहे. सोळुंके आणि देसाई हे सांगवी पोलीस ठाण्यात (Sangavi Police Station) कार्यरत आहेत. याप्रकरणी 42 वर्षाच्या व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.

 

 

आरोपी महिला पोलीस उपनिरीक्षक हेमा सोळुंके यांना आज शिवाजीनगर विशेष न्यायालयात (Shivajinagar Court Pune) हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकिल प्रदीप गेहलोत (Adv Pradeep Gehlot) यांनी युक्तीवाद करताना या गुन्ह्यातील आरोपी अशोक देसाई हा लाचेच्या रकमेसह फरार झाला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या मदतीने फरार आरोपीकडून लाचेची रक्कम हस्तगत करायची आहे. तसेच आरोपी सोळुंके यांच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहेत. याशिवाय या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास करायचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तीवाद केला. तर बचाव पक्षाकडून अॅड. सुहास कोल्हे (Adv. Suhas Kolhe) यांनी युक्तीवाद केला. सरकारी वकिलांचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

 

Web Title :- Anti Corruption Bureau Pune | Psi hema solunke send in pcr for 4 days acb pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा