Anti Corruption Bureau Pune | शिरूर कार्यालयाच्या आवारातच 1 लाखाची लाच घेताना अधिकार्‍यासह दोघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption Bureau Pune | पिकअप गाडीमध्ये सरपण भरून जाताना ताब्यात घेण्यात आल्यानंतर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी 1 लाख रूपयाची लाच शिरूर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या (Forest Department) आवारात घेताना वनपाल आणि वनरक्षकास अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या (Anti Corruption Bureau Pune) पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरूध्द शिरूर पोलिस ठाण्यात (Shirur Police Station) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

 

सागर नवनाथ भोसले Sagar Navnath Bhosale (34, पद – वनपाल, वनपरिक्षेत्र कार्यालय शिरूर, जि. पुणे) आणि संजय जयसिंग पाव्हणे Sanjay Jaisingh Pavhne (45, पद – वनरक्षक, वनपरिक्षेत्र कार्यालय शिरूर, जि. पुणे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांची पिकअप गाडी सरपण भरून जात होती. त्यावेळी वनपाल सागर भोसले (Forest Officer Sagar Bhosale) आणि वनरक्षक संजय पाव्हणे (Sanjay Pavhne) यांनी पिकअपला वाहतुकीचा परवाना नसल्याचे सांगून गाडीवर वनविभागाकडून कारवाई न करण्यासाठी 1 लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने याबाबत पुण्यातील अ‍ॅन्टी करप्शनच्या कार्यालयात (Anti Corruption Bureau Pune) तक्रार नोंदविली. प्राप्त तक्रारीची दि. 10 नोव्हेंबर 2021 रोजी पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये दोघेही लाचेची मागणी करीत असल्याचे निष्पन्न झाले.

पुणे अ‍ॅन्टी करप्शनच्या (Anti Corruption Bureau Pune) पथकाने आज (दि. 18 नोव्हेंबर 2021) शिरूर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात सापळा रचला.
त्यावेळी सरकारी पंचासमक्ष भोसले आणि पाव्हणे यांनी तक्रारदाराकडून 1 लाख रूपयाची लाच घेतली.
त्यावेळी त्यांना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने ताब्यात घेतले. दोघांविरूध्द शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

 

ही कारवाई पुणे अ‍ॅन्टी करप्शनचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अप्पर अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav), अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgauda)
यांच्या मार्गदर्शनखाली उप-अधीक्षक श्रीहरी पाटील (DySp Shrihari Patil) आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title :-Anti Corruption Bureau Pune | pune acb arrest sagar forest officer navnath bhosale and sanjay jaisingh pavhne While taking bribe of Rs one lacs at shirur forest office

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Siddharth Chandekar | ‘तुला परवानगी देणारा मी कुणीच नाही’ ! ‘तिच्यासाठी’ची सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट प्रचंड व्हायरल

Sharad Pawar | अमरावतीच्या हिंसाचारावरून पवारांचा हल्लाबोल; म्हणाले – ​’भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची आहे’

Amit Shah | 26 नोव्हेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यात; मात्र, शरद पवारांचे निमंत्रण नाकारले?