Anti Corruption Bureau Pune | पुण्याच्या अ‍ॅन्टी करप्शनची कारवाई ! 70 हजाराच्या लाच प्रकरणी महिला पोलिस उपनिरीक्षक (PSI) ‘जाळ्यात’ तर सहाय्यक फौजदार ‘फरार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption Bureau Pune | पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत (acb trap in pimpri chinchwad in police commissionerat area) मोठी कारवाई केली आहे. लाच प्रकरणी महिला पोलिस उपनिरीक्षक आणि एक सहाय्यक फौजदार अ‍ॅन्टी करप्शनच्या (Anti Corruption Bureau Pune) ‘रडार’वर आले आहेत. दरम्यान, अ‍ॅन्टी करप्शनच्या कारवाईमुळं पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात प्रचंड खळबळ उडाली आहे. सांगवी पोलिस ठाण्याच्या (sangavi police station) परिसरातच ‘ट्रॅप’ यशस्वी (ACB Trap) झाल्यानं पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

महिला पोलिस उपनिरीक्षक हेमा सोळुंके (PSI Hema Solunkhe) असे अ‍ॅन्टी करप्शनच्या रडारवर आलेल्या महिला अधिकार्‍याचं नाव आहे. दरम्यान सहाय्यक फौजदार अशोक देसाई यांनी गुंगारा दिल्याचं समजतं. याबाबत अ‍ॅन्टी करप्शनचे उपाधिक्षक श्रीहरी पाटील (DySP Shrihari Patil) यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कारवाई सुरू असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, सहाय्यक फौजदार फरार झाल्याचं त्यांनी सांगितलं. केलेल्या तक्रार अर्जावर कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुणे अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केली असता त्यामध्ये महिला उपनिरीक्षक हेमा सोळुंखे आणि सहाय्यक फौजदार अशोक देसाई (ASI Ashok Desai) हे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे (SP Rajesh Bansode) यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅन्टी करप्शनच्या (Anti Corruption Bureau Pune) पथकाने आज सायंकाळी सांगवी पोलिस ठाण्याच्या (sangavi police station) परिसरात सापळा रचला. पंचासमक्ष लाच घेताना संबंधित महिला उपनिरीक्षक Hema Siddharam Solunke वर कारवाई करण्यात आली आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात सापडल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे.

[आरोपी :- १) लोकसेवक- श्रीमती हेमा सिध्दराम सोळुंके, वय- २८ वर्ष,महिला पोलीस उपनिरीक्षक , २) अशोक बाळकृष्‍ण देसाई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, दोन्ही नेमणूक- सांगवी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय]

 

Web Title :- Anti Corruption Bureau Pune | Pune anti-corruption Bureau action! 70,000 bribery case: police Sub Inspector Hema Solunkhe and ASI Ashok Desari caught while takeing bribe of 70000

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘2024 मध्ये केंद्रात मोदी सरकारच येईल, विरोधकांमध्ये अंतर्गत सामना सुरूय’

Pune Court | अल्पवयीन मुलीला लग्नाची मागणी घालणे म्हणजे लैंगिक छळ नाही; न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निष्कर्ष

Pune Crime | घरफोडी व वाहनचोरी करणारा सराईत गुन्हेगार विमानतळ पोलिसांकडून गजाआड, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

Omicron Covid Variant | अखेर भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव ! कर्नाटकमध्ये 2 रुग्ण सापडले; महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं

Pune News | अ‍ॅड. मधुकर वाघमारे लिखित ‘मधुपुष्प’चा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न ! अविनाश महातेकर म्हणाले – ‘आत्मचरित्र हे सामाजिक दस्तावेज असतात’