Anti Corruption Bureau Pune | पुणे महापालिकेचा आरोग्य निरीक्षक लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Anti Corruption Bureau Pune | पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकास (PMC Health Inspector) लाच (Bribe) घेताना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune) आज (गुरूवार) दुपारी रंगेहाथ पकडले आहे. कचरा गोळा करणार्‍या एकाने तक्रार दिल्यानंतर अ‍ॅन्टी करप्शन विभागाने ही कारवाई केली आहे. मनपाच्या आरोग्य निरीक्षकाने डयुटी ठराविक ठिकाणी देण्यासाठी 5 हजाराची लाच घेतल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

स्वप्नील कोठावळे (Swapanil Kothawale) असे लाच घेणार्‍या आरोग्य निरीक्षकाचे नाव आहे.
कचरा गोळा करणार्‍यांना ठराविक ठिकाणी डयुटी देण्याासाठी कोठावळेंनी लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रार केली होती.
प्राप्त तक्रारची शहानिशा करण्यात आली. पुण्याच्या अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने आज सापळा रचला होता.
त्यांनी आरोग्य निरीक्षक स्वप्नील कोठावळेंनी पंचासमक्ष 5 हजार रूपयांची लाच घेतली आहे. आरोग्य निरीक्षकाने लाच घेतल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे (SP Rajesh Bansode), अप्पर अधीक्षक अप्पर सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav),
अधीक्षक सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgouda) यांच्या मार्गदर्शनाखाली एससीबीच्या पथकाने केली आहे.
लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार द्यावी असे आवाहन पुणे अ‍ॅन्टी करप्शनकडून करण्यात आले आहे.

 

Web Title : Anti Corruption Bureau Pune | Pune Municipal Health Inspector caught taking anti-corruption net; Huge excitement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | इंटेलिजन्स ब्युरोचे माजी संचालक विद्याधर वैद्य यांचे पुण्यात निधन

Earn Money | सरकारी बँकांसोबत काम करून दरमहा कमावू शकता 5000 रुपये, जाणून घ्या कुठे आणि कसा करावा अर्ज?

Nilofar Malik | नवाब मलिकांची मुलगी निलोफर यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस, माजी मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढणार?