Anti Corruption Bureau Pune | पिंपरी चिंचवड महापालिकेतील दोन लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Corporation) थेरगांव करसंकलन कार्यालयातील (Thergaon Tax Collection Office, PCMC) दोन कर्मचाऱ्यांना लाच घेताना (Accepting Bribe) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune) रंगेहाथ शुक्रवारी (दि.17) पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune) प्रदीप शांताराम कोठावदे Pradeep Shantaram Kothavade (वय-39) आणि हैबती विठ्ठल मोरे Haibati Vitthal More (वय-51) असे लाच घेताना रंगेहाथ पकलेल्या दोन लिपीक यांचे नाव आहे.

 

याप्रकरणी 24 वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau Pune) तक्रार केली आहे.
तक्रारदार यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय (Real estate business) आहे. तक्रारदार हे प्लॅट, शॉप, ऑफिस भाड्याने देणे तसेच भाडे करारनामा, खरेदीखत, मिळकत हस्तांतरणाची कामे करतात. तक्रारदार हे संबंधीत लोकांच्या मिळकतीचे हस्तांतरण व कर पावती मधील नावाची दुरुस्ती करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयाच्या (D Regional Office) कर संकलन विभागातील प्रदीप कोठावदे व हैबती मोरे यांच्याकडे गेले होते. नावाची दुरुस्ती करुन देण्यासाठी दोघांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली.

प्रदीप कोठावदे याने 5 हजार 500 रुपये आणि हैबती मोरे याने 3 हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गुरुवारी (दि.16) तक्रार केली.
प्राप्त तक्रारीनुसार पुणे एसीबीने (Pune ACB) शुक्रवारी (दि.17) पडताळणी केली असता दोघांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
शुक्रवारी सायंकाळी थेरगाव येथील कर संकलन कार्यालयात सापळा रचून दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.
पुढील तपास पोलीस उप अधीक्षक विजयमाला पवार (Deputy Superintendent of Police Vijaymala Pawar) करीत आहेत.

 

Web Title :- Anti Corruption Bureau Pune | Two clerks of Pimpri Chinchwad Municipal Corporation caught by anti-corruption pune while takeing bribe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anti Corruption Bureau | 1 रुपया हुंडा घेऊन सर्वांकडून पाठ थोपटून घेणारा नार्कोटिक्स विभागातील पोलीस निरीक्षक 2 लाखांची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

Sukesh Chandrashekhar | ‘जॅकलिन-नोरा’नंतर श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टी सुद्धा ठग सुकेश चंद्रशेखरच्या केसमध्ये ‘सामील’?

Urfi Javed | उर्फी जावेदनं डेनिम जॅकेटवर लिहिला जबरदस्त संदेश म्हणाली – “मैरिटल रेप सुद्धा रेपचं आहे..!”