Anti Corruption Bureau Ratnagiri | 14 हजाराची लाच घेताना खेड महसूल विभागातील मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

खेड/रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – सातबारा उताऱ्यावर नावाची नोंद करण्यासाठी 14 हजार रुपयांची लाच स्वीकारताना (Accepting Bribe) खेड महसूल विभागातील (Khed Revenue Department) मंडल अधिकाऱ्याला रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Ratnagiri) सापळा रचून रंगेहाथ पकडले. रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Ratnagiri) ही कारवाई बुधवारी (दि.12) दुपारी भरणे ग्रामपंचायत कार्यालयात केली. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

सचिन यशवंत गोवळकर Sachin Yashwant Gowalkar (वय-43) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे. भरणे येथील एका 72 वर्षीय वृद्धाने जमीन खरेदी केली आहे. खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारावर (7/12) त्यांच्या नावाची नोंद घालून ती मंजूर करुन देण्यासाठी अर्ज केला होता. या नोंदीसाठी सचिन गोवळकर यांनी तक्रारदार यांच्याकडे 15 हजार रुपयांची मागणी (Demand Bribe) केली होती. त्यानंतर तडजोडीनंतर 14 हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार त्यांनी बुधवारी भरणे ग्रामपंचायतीत 14 हजार रुपये स्विकारले. त्याचवेळी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Ratnagiri) गोवळकरला अटक केली.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले (SP Punjabrao Ugale), अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर (Additional Superintendent of Police Anil Gherdikar) यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण (Deputy Superintendent of Police Sushant Chavan), पोलीस हवालदार विशाल नलावडे, पोलीस नाईक योगेश हुंबरे, दीपक आंबेकर, पोलीस शिपाई हेमंत पवार, चालक पोलीस शिपाई प्रशांत कांबळे यांच्या पथकाने केली..

Web Title : Anti Corruption Bureau Ratnagiri | while accepting a bribe of rs 14000 in khed the team nabbed a revenue officer Sachin Yashwant Gowalkar